'सासूने जावयावर जादू केली अन्, त्याला आपल्या...' आता समोर आली भलतीच माहिती
UP News: उत्तरप्रदेशातील अलीगडमधील सासू आणि जावयाच्या प्रेमप्रकरणासंबंधी एक नवीन बाब समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी राहुलच्या वडिलांनी राहुलच्या होणाऱ्या सासूवरच जादू-टोणा आणि वशिकरणाचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अलिगडमधील सासू जावयाच्या प्रेमकथेतील नवीन खुलासा
सासू जावयाच्या प्रेमकहानीमध्ये जादू टोण्याचा ट्विस्ट
आरोपी तरुणाच्या वडिलांच्या मुलाच्या होणाऱ्या सासूवर आरोप
Mother-in-law and Son-in-law Love Story: अलिगढ: अलिगढमधील मडराक क्षेत्रातील मनोहरपुर गावात लग्नाआधीच जावई सासूला घेऊन पळून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आता नवीन बाब समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी राहुलच्या वडिलांनी राहुलच्या होणाऱ्या सासूवरच जादू-टोणा आणि वशिकरणाचा आरोप केला आहे. मीडियाशी बोलताना, राहुलच्या वडिलांनी त्याच्या होणाऱ्या सासूवर जादू-टोणा केल्याचा आरोप केला आहे. राहुलचे वडील म्हणाले, "त्याची होणारी सासू इथे आली आणि पाच दिवस राहिली. तेव्हा तिने माझ्या मुलासाठी दोन ताबीज आणले. एक ताबीज गळ्यात आणि दुसरे कमरेला बांधलेले होते. आता तो अशा प्रकारे गायब झाल्यानंतर हे सर्व त्याच ताबीजने टाकलेल्या जादूचे परिणाम आहे, असं वाटत आहे."
पोलिसांचे लक्ष आता मेहुण्याकडे
मडराक पोलिसांनी रविवारी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील रहिवासी असलेल्या आरोपी तरुणाच्या वडीलांना, मेहुण्याला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना चौकशीसाठी बोलावले. त्यामधील, राहुलचा मेहुणा हा आता पोलिसांच्या रडारवर आहे. याचं कारण म्हणजे सुरुवातीला दोघांची माहिती उत्तराखंडमध्ये मिळाली होती. संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांची ही चौकशी सुरू होती. डीएसपी महेश कुमार यांच्या मते, तपास आणि शोध अजूनही सुरू आहे. मात्र, अद्याप दोघेही हाती लागलेले नाहीत.
हे ही वाचा: नातेवाईकानंच घात केला! विश्वास ठेवून सोबत पाठवलं, पण नराधमानं मुलीवर अत्याचार करुन संपवलं
संपत्तीमधून मुलाला बेदखल करण्याचा निर्णय
"मुलाच्या अशा वागण्यामुळे परिसरात आणि समाजात आमच्या प्रतिष्ठेला बट्टा लागला" असे राहुलच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे राहुलच्या वडिलांच्या मते, त्यांच्या मुलाला आता घरात स्थान नाही. यासोबतच त्याला त्यांच्या संपत्तीमधून बेदखल करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, राहुलने घरातून काही दागिने आणि पैसेसुद्धा नेले आहेत. तर, पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ते परत करण्यास राहुलच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं आहे.










