बायकोचा राग थेट ‘खाकी वर्दीवर’; पतीची पोलिसांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

angry husband kicked and beaten 2 police officers in thane
angry husband kicked and beaten 2 police officers in thane
social share
google news

Crime : 

ADVERTISEMENT

कल्याण : पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेलेल्या 2 पोलीस (Mumbai Police) कर्मचाऱ्यांना संतप्त पतीने लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कल्याण पूर्व भागातील विजयनगरमधील धनलक्ष्मी सोसायटीत हा प्रकार घडला आहे. नागेशनाथ निवृत्ती घुगे आणि खंडेराव सांगळे अशी हल्ला झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नाव आहेत. तर महेश माने असं हल्लेखोर पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी महेशला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. (2 police officers who went to resolve the quarrel between husband and wife were kicked and beaten by the angry husband)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ठाणे पोलीस नियंत्रण कक्षातून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात संपर्क करण्यात आला. कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विजयनगर भागात असलेल्या धनलक्ष्मी सोसायटीमध्ये एक पती आपल्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत आहे. त्यामुळे महिलेला मदतीची गरज आहे. या फोननंतर तातडीने वरिष्ठांनी त्याठिकाणी जाण्याच्या सूचना हवालदार घुगे आणि सांगळे यांना दिल्या.

हे वाचलं का?

पती आणि दीर लहान कपडे घालण्यास आणि दारू पिण्यास सांगत, तिने गाठले पोलीस स्टेशन

आदेशानुसार पोलीस तक्रारदार महिलेच्या घरी गेले. तिथं गेल्यानंतर महेश माने हा पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तिला मारहाण करत होता. घुगे आणि सांगळे यांनी पती महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले. त्यावर तुम्ही मला सांगणारे कोण? असा प्रश्न करत आरोपी महेश माने याने पोलिसांना शिवीगाळ आणि मारहाण करत त्यांना घराबाहेर फरफटत नेले. इमारतीखालील वाहनतळावरील दुचाकीवर हवालदार घुगे यांना लोटून दिले. यात हवालदार घुगे यांना गंभीर दुखापत झाली.

PM मोदी फॉलोअर असलेल्या हिंदुत्ववादी महिलेला गुजरातमध्ये अटक : कोण आहे काजल हिंदुस्तानी?

संतप्त महेश हा दोन्ही पोलिसांना दाद देत नसल्याने दोघांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातून वाढीव कुमक मागविली. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि शोध पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महेशला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याच्यावर मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT