Crime News : पार्टीत दारु पिता पिता, वाद गेला टोकाला आणि.., घटनेचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Noida crime uttar pradesh crime news
Noida crime uttar pradesh crime news
social share
google news

Crime News : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पुन्हा एकदा युवकांच्या हाणामारीमुळे जोरदार हंगामा झाला आहे. हाणामारी झाल्यानंतर हा वाद दारुच्या नशेत केल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना गार्डन गॅलरियामधील एफबारमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. या हाणामारीत लाथाबुक्यांनी मारहाण करुन दारुच्या बाटल्याही एकमेकांवर फेकण्यात आल्या आहेत. या आधीही बारमधील पार्टीत जाताना हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी एका युवकाला इतकी मारहाण केली होती की, त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे आता पोलिसांनीही या घटनेची चौकशी सुरु केली आहे. (argument between two groups liquor party youth killed, video incident went viral uttar pradesh noida )

ADVERTISEMENT

वाद गेला टोकाला

नोएड्यातील गार्डन गॅलेरिया मॉलमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एफ बारमध्ये जोरदार हंगामा झाला आहे. मॉलमधील बारमध्ये पार्टी चालू होती. त्यावेळी दोन गटात कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद नंतर इतका टोकाला गेला की, लाथा-बुक्यांनी मारायला सुरुवात केली. या हाणामारीचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा वाद दारु पिऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओ व्हायरल

दोन गटात सुरु झालेल्या हाणामारीच्या व्हिडिओमध्ये दोन गटातील व्यक्ती एकमेकांवर हल्ला करत आहेत. तर त्यातील काही लोकं तो वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. वादावादीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांची चौकशी केली आहे.

हे वाचलं का?

बाऊन्सरानी केली मारहाण

काही महिन्यापूर्वी गार्डन गॅलेरियामध्ये बाऊन्सरानी मारहाण केल्यामुळे एका युवकाचा मृत्य झाला होता. पार्टी चालू असताना 35 वर्षाच्या युवकाचा पाठलाग करुन त्याची हत्या करणयात आली होती. त्या मारहाणीत मृत झालेला युवक हा बिहारचा राहणारा होता. त्या युवकाच्या मृत्यूनंतर मात्र लेमन्स बारमधील 8 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना अटक केली होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Maratha Morcha : लाठीमाराचा मुद्दा… अजित पवारांचा चढला पारा; म्हणाले, ‘राजकारण सोडेन’

आधीही एका युवकाचा मृत्यू

या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले होते की, बाऊन्सर लोकांनी त्या युवकाला इतकी मारहाण केली होती की, युवकाचा मृत्यू झाला होता. लेमन्स बारमध्ये सुरु असलेल्या पार्टीत ब्रिजेश रॉय जात होता. त्यावेळी ब्रिजेश रॉय आणि हॉटेलच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता. तर या प्रकरणी पोलिसांनी सांगितले होते, की ब्रिजेश रॉय बरोबर हॉटेल कर्मचाऱ्यांनी पैशासाठी वाद घातला होता. आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> CM Eknath Shinde:’…तसा आदेश कसा दिला जाऊ शकतो’; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT