Honeymoon वेळी झालेला पती-पत्नीचा मृत्यू, आता काकूने सांगितली नवी कहाणी
अयोध्येतील एका दाम्पत्याचा लग्नाच्या पहिल्याच रात्री मृत्यू झाला. पण या प्रकरणी अद्यापही नेमकं सत्य समोर आलेलं नाही. अशावेळी आता याप्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT

अयोध्या: लग्नाच्या पहिल्याच रात्री वधू-वरांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आता या प्रकरणी एक नवीन अपडेट समोर आली आहे. एकीकडे, वर प्रदीप कुमार आणि वधू शिवानी यांच्या कुटुंबाला कोणतीही कारवाई नको आहे. पण काकीने बोलताना एका वेगळ्याच गोष्टीकडे इशारा केला आहे. आता हे प्रकरण अधिक गूढ बनले आहे. या प्रकरणात पोलीस आता चांगलेच गुंतले आहेत.
वधूचे काका संतराम म्हणाले की, प्रदीप आणि शिवानीचे लग्न एक वर्षापूर्वीच ठरले होते. दोघांमध्ये खूप गप्पा व्हायच्या. शिवानी या लग्नाने खूप आनंदी होती. तिने तिच्या लग्नाची सर्व खरेदी स्वतः केली होती. स्वतः लेहंगा आणि कपडे निवडले होते. त्यांच्या नात्यात असे काहीही नव्हते जे त्रासदायक होते.
हे ही वाचा>> Honeymoon सेलिब्रेट करताना प्रदीप आणि शिवानीचा कसा झाला मृत्यू? हादरवून टाकणारी गोष्ट आली समोर
दुसरीकडे, वधूच्या पालकांचे म्हणणे आहे की, घटनेच्या वेळी शिवानीकडे मोबाइल फोन नव्हता. काही दिवसांपूर्वीच तिचा मोबाइल खराब झाला होता. ती मोबाइल फोनशिवाय तिच्या सासरच्या घरी गेली होती.
प्रदीपच्या कुटुंबातील सदस्यांचे म्हणणे आहे की, तो खूप शांत मुलगा होता. शिवानीही एक चांगली मुलगी होती. दोघांमध्ये प्रेम होते. त्यांनी या घटनेत तिसऱ्या पक्षाचा सहभाग असण्याची शक्यताही नाकारली आहे आणि कोणतीही कारवाई करण्यास नकार दिला आहे. शिवानीचे काकाही प्रदीपचे कौतुक करताना दिसले.










