Badlapur News: बदलापूर हादरलं! चिमुरड्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार; संतप्त पालकांनी काढला मोर्चा

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण

point

संतप्त पालक तसेच बदलापूरकरांचे शाळेबाहेर ठिय्या आंदोलन

point

काय आहे नेमकं प्रकरण?

Badlapur Crime News : बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पालक आणि बदलापूरकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ज्या शाळेत ही दुर्दैवी घटना घडली होती त्या शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच संतप्त पालक तसेच बदलापूरकर जमले असून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. "आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत" अशी पालकांची भावना असून, त्यांनी शाळा प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. (Badlapur Crime News school male cleaner abuse 3-4 years girls in school toilet angry parents protest outside school)

ADVERTISEMENT

काय आहे नेमकं प्रकरण?

बदलापुरात एका नामांकित शाळेत तीन ते साडेतीन वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पालकांच्या भावना तीव्र आहेत. शाळेच्या गेटवर मोठ्या संख्येने पालक आणि स्थानिक नागरिक जमले असून, त्यांनी शाळेतील निष्काळजीपणावर रोष व्यक्त केला आहे. 

हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईत तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी, 'या' जिल्ह्यांना IMD चा महत्त्वाचा इशारा!

यावर शाळा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस भूमिका मांडण्यात आलेली नाही, यामुळे संतप्त पालकांच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. शाळेने मुलींच्या सुरक्षेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पावलं उचलावीत, असं पालक आणि बदलापूरकर सांगत आहेत.

हे वाचलं का?

घटनास्थळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेतली आहे. पोलिसांच्या उशिरा गुन्हा दाखल करण्यावर नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पालकांची मागणी आहे की शाळेने पुढे येऊन दोषींवर कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मुलींच्या सुरक्षिततेसाठी योग्य उपाययोजना कराव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Sharad Pawar : ''संभाजी भिडे वगैरे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची...'', पवार भडकले!

बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या दोन मुलींवर सफाईचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराच्या एका कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या अत्याचारप्रकरणी सोमवारी (19 ऑगस्ट) कारवाई करण्यात आली आहे. 

ADVERTISEMENT

आदर्श शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो कंत्राटदारामार्फत शाळेत सफाईचे काम करीत होता. तसेच या प्रकरणात दडपशाहीचा आरोप ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांच्यावर झाला त्यांच्यावर कारवाई केली असून त्यांची तत्काळ बदली केली आहे. तर दुसरीकडे शाळा प्रशासनाने मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिका यांचे निलंबन केले असून, मुलांना ने-आण करणाऱ्या सेविकांना बडतर्फ केले आहे. या घटनेमुळे सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT