Crime: पतीची हत्या अन् नंतर बनवला कढी-भात.. बँक मॅनेजरच्या विकृत पत्नीचं भयंकर कृत्य!
आग्रा येथील बँक मॅनेजरच्या पत्नीने शांत डोक्याने हत्या केली. त्यानंतर पतीचा मृतदेह घरात 17 तास लपवून ठेवून मोलकरणीला कढी भात आणि चपात्याही करायला सांगितल्या. मात्र त्यानंतर ही घटना पोलिसांना समजताच पत्नी फरार झाली आणि शवविच्छेदनाच्या अहवालानंतर धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळेच पोलिसांच्यामुळे पत्नी फरार असल्याचा आरोप बँक मॅनेजरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ADVERTISEMENT
Bank Manager Murder: आग्रा येथील बँक मॅनेजर हत्या (Murder) प्रकरणाला 12 दिवस उलटून गेल्यानंतर काही धक्कादायक गोष्टी आता समोर आल्या आहेत. आग्रा येथील रामरघु एक्झोटिका कॉलनीतील बँक मॅनेजर सचिन उपाध्याय (Sachin Uadhyay) यांच्या हत्येनंतर काही अनेक नवे खुलासे झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या हत्येतील धक्कादायक बाब ही आहे की, बँक मॅनेजरच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम (Post mortem) करुनही 4 दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.(bank manager murdered by his wife in agra, body hid for 17 hours)
ADVERTISEMENT
पोलिसांचा निष्काळजीपणा
बँक मॅनेजरची हत्या झाल्यानंतर पोलिसांमुळे आणि त्यांच्या निष्काळजीपणामुळेच आरोपी पळून गेल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच आतापर्यंत एकाचा आरोपीला ताब्यात घेण्यात आल्याचा आरोप सचिन उपाध्याय यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
आत्महत्या आहे तर जखमा कशा?
सचिन उपाध्याय यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी ही सचिन उपाध्याय यांची पत्नी प्रियंका आणि इतर आरोपी अजूनही फरार आहेत. 12 ऑक्टोबर रोजी सचिन उपाध्याय यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी सचिनच्या शरीरावर जखमा आणि भाजलेल्या खाणाखुणाही दिसून येत होत्या. तर त्यांच्या मानेवरही काही जखमा झाल्या होत्या असंही पोलिसांनी नमूद केले होते.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> क्रुरतेची हद्द! जमिनीचा वाद, ट्रॅक्टरखाली 8 वेळा चिरडले, वाचवण्याऐवजी लोकं व्हिडीओ करण्यात दंग
मुख्य आरोपी पत्नी
सचिन यांचा मृतदेह सापडल्यानंतरही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच या हत्येचं प्रकरण उघड झालं नाही. मृतदेह मिळूनही 7 दिवसांनी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. तर सचिन यांची पत्नी प्रियांका उर्फ मोनाने सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात हुंड्यासाठी आपला छळ केला जात असल्याची तक्रार महिला पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र त्यानंतर सचिन यांचा मृतदेह सापडूनही त्यानंतर पोलिसांनी प्रियांकाला अटक केली नाही.
हत्या करुन बनवलं जेवण
सचिन उपाध्याय यांच्या हत्येला 12 दिवस उलटून गेल्यानंतर एक गोष्ट उघड झाली आहे. सचिन यांच्या पत्नीने हत्या करुन त्यांचा मृतदेह खोलीत लपवून ठेवून तिने मोलकरणीला कढीभात आणि 16 रोट्या बनवण्यास सांगितल्या होत्या असंही तपासात उघड झालं आहे.
ADVERTISEMENT
संशय येऊ नये म्हणून नाटक
बँक मॅनेजरच सचिन उपाध्यायची हत्या केल्याचा संशय येऊ नये म्हणूनच तिने अनेक नाटकं केल्याचे पोलिसांनी सांगितले. कारण प्रियांकाकडून पहिल्यापासूनच कुटुंबीयांच्या डोळ्यात धूळफेक करण्यात येत होती. या हत्येचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रियांकाने शेजारील कुटुंबीयांचा फोन घेऊन तिने आपल्या वडिलांना दोन वेळा फोन लावून बोलली होती. प्रियांकाचे वडील बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे ती आपल्या वडिलांबरोबर नेमकं काय बोलली हे आता फक्त प्रियांकाच सांगू शकणार आहे.
ADVERTISEMENT
‘ते’ धाडस केलं नाही
सचिन उपाध्याय यांची हत्या झाल्यानंतर शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतर सांगण्यात आले की, सचिन यांची हत्या 11 ऑक्टोबर रोजीच करण्यात आली होती. म्हणजेच त्यांचा मृतदेह हा तब्बल 17 तास लपवून ठेवण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता कुटुंबीयांनीही आरोप केला आहे की, त्या परिसरात सीसीटीव्ही नसते तर सचिन यांचा मृतदेह बेपत्ता करण्यात आला असता. सीसीटीव्ही लावल्याची माहिती प्रियांकाला माहिती असल्यामुळेच तिने हे धाडस केले नाही असा आरोपही सचिन यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
हे ही वाचा >> कराड शहर स्फोटानं हादरलं! 9 जखमी, 7 घरांना गेले तडे, नेमकं घडलं काय?
मृतदेह खोलीत लपवला
सचिन उपाध्याय यांची हत्या करण्यात त्यांचा मेहुणा आणि त्यांच्या सासऱ्याचाही हात असल्याचा आरोप सचिन उपाध्याय यांच्या वडिलांनी केला आहे. सचिनच्या वडिलांनी सांगितले की, या हत्येनंतर ज्या खोलीत मृतदेह लपवला होता, त्या खोलीला प्रियांकाने कुलूपही लावले होते. तर ही हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचणारा पहिला व्यक्ती प्रियांकाचा भाऊ होता असंही त्यांनी आरोप केला आहे.
हे ही वाचा >>भावाच्या कृत्याने अलिबाग हादरलं! सख्ख्या बहिणींना ‘सूप’मधून दिला विषाचा ‘घोट’
हत्येचं नेमका हेतू काय?
या हत्येनंतर शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांना समजले की, सचिन उपाध्याय यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. मात्र त्याच्या गळ्यावर भाजल्याच्याही जखमा असून ही हत्या करण्यामागे नेमका हेतू काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT