Crime News: तरुणीचे नग्न फोटो आणि Video व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा बलात्कार
Beed Crime: बीड जिल्ह्यातील केजमधील महाविद्यालयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध बलात्कार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीड जिल्ह्याच्या केज मधील महाविद्यालय तरुणीवर लैंगिक अत्याचार

शरीरसंबंधाचे नग्न फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार केला अत्याचार

आरोपीविरुद्ध बलात्कार, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल
Beed Rape Case: रोहिदास हातागळे, बीड: नीटची तयारी करीत असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील केजमध्ये घडली आहे. यावेळी आरोपीने मोबाइलवर पीडितेचे नग्न फोटो व व्हिडीओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल केलं. ज्यानंतर त्याने तब्बल 10 ते 12 वेळा बलात्कार केल्याचं आता समोर आलं आहे. (beed crime news accused repeatedly rapes college girl by threatening to spread unclad photos and videos)
नेमकी घटना काय?
याबाबतची माहिती अशी की, सुमारे नऊ महिन्यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये केज येथील नीटची तयारी करीत असलेली 19 वर्षाची महाविद्यालयीन तरुणी ही लातूरला जाण्यासाठी बसची वाट पहात थांबली होती. त्याचवेळी तिथे तिच्या ओळखीचा व सोशल मीडियावर ओळख झालेला सूरज गुंड नावाचा एक तरुण तेथे आला. तो तिला म्हणाला की, तो पण लातूरला जात आहे. असे म्हणून त्याने त्या युवतीला त्याच्या चारचाकी कारमध्ये बसविले. केजपासून पुढे 70 किमी अंतरावर असलेल्या रेणापूर येथील एका हॉटेलवर त्याने गाडी थांबवली.
हे ही वाचा>> Jalna Crime: धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या! 'त्या' ढाब्यावर नेमकं काय घडलं?
यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने त्या हॉटेलच्या एका रूममध्ये घेऊन गेला. त्यावेळी तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता तिचे तोंड दाबून त्याने तिचे सर्व कपडे काढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याने मोबाइलमध्ये तिचे नग्न फोटो आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग केले.
तसेच हा प्रकार कुणाला सांगितला तर हे सर्व फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही त्याने तिला दिली. त्यानंतर त्याने तिला लातूर येथील हॉस्टेलवर नेऊन सोडले. पण नंतर तो तिला वारंवार फोन करून तिचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे आणि तिच्या आई-वडिलांसह नातेवाईकांच्या मोबाइलवर पाठविण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करत असे.