Jalna Crime: धारदार शस्त्राने वार करुन तरुणाची निर्घृण हत्या! 'त्या' ढाब्यावर नेमकं काय घडलं?
Jlana Crime Latest Update : जालना शहराजवळील जामवाडी परिसरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जालन्यात हमाल काम करणाऱ्याला तरुणाची निर्घृण हत्या
ढाब्यावर तरुणावर हल्ला झाल्याचं कळताच पोलिसांची घटनास्थळी धाव
पोलिसांनी केली मोठी कारवाई
Jlana Crime Latest Update : जालना शहराजवळील जामवाडी परिसरात एका तरुणाची निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. 5/ 6 जणांच्या टोळक्याने तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आलीय. शेख हाफिज शेख हबीब असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शेख जालन्यातील कन्हैया नगरमध्ये राहत होता. जामवाडी शिवारातील एका ढाब्यावर असलेल्या रूममध्ये टोळक्यांनी शेखची हत्या केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयीताला ताब्यात घेतलं आहे. तसच जालना पोलिसांनीही इतर संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, जालना शहराजवळील जामवाडी शिवारातील एका हॉटेलच्या रूममध्ये तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. 5/ 6 जणांच्या टोळक्याने तरुणाची हत्या केल्याची माहिती समोर आलीय. शेख हाफिज शेख हबीब (रा.कन्हैया नगर जालना) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतल असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा >> Lokpoll Survey : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वात मोठा सर्व्हे आला समोर! MVA उडवणार महायुती सरकारची झोप
जालना शहरात हमाली काम करणाऱ्या शेख हफीज शेख हबीब या तरुणावर जामवाडी शिवारातील एका ढाब्यावर असलेल्या रूममध्ये काही जणांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून टोळक्याने त्या तरुणाला गंभीर जखमी केलं होतं. त्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणावर टोळक्याने हल्ला का केला, हे अद्याप समजू शकलेले नाहीये.
हे वाचलं का?
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तालुका जालना पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात एका संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर तालुका जालना पोलीस देखील इतर संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
हे ही वाचा >> Maharashtra Weather: गौराईच्या आगमनाला पावसाची हजेरी? पाहा आजचा IMD चा अंदाज
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT