Beed Crime : बीडमध्ये अल्पवयीन तरुणाला घेरून मारलं, तीच पद्धत आणि तसाच व्हिडीओ व्हायरल, प्रकरण काय?
अंजली दमानिया यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे. तर पँथर सेनेची दीपक केदार यांनीही काही प्रश्न उपस्थित केले आहेत. "होलार समाजाचा अनुसूचित जातीचा कृष्णा साळे दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे असं म्हणत गंभीर आरोप केले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडमध्ये गुन्हेगारांचे तेच प्रताप सुरू

गुन्हेगारीचा ट्रेंड आता अल्पवयीन तरुणांमध्येही

रिंगण करुन मारहाण करणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरल
Beed Crime News : बीडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या घटना हादरवून सोडणाऱ्या आहेत. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, त्यापूर्वीचे उघड झालेले प्रकरणं, राजकीय वैमनस्यातून एकमेकांना अडकवण्याचे प्रयत्न हे सगळं चर्चेत आहे. पण गुन्हेगारीचा ट्रेंड आता अल्पवयीन मुलांपर्यंतही पोहोचल्याचं दिसतंय. नुकताच बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातून असाच एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये काही किशोरवयीन मुलं गुन्हेगारांचा ट्रेँड फॉलो करताना दिसतायत.
हे ही वाचा >> Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे मंदिरांमध्ये भाविकांची संख्या घटली, पर्यटकांची संख्याही घटली?
अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडीमध्ये घडलेल्या या घटनेमुळे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. कृष्णा साळे नावाच्याअल्पवयीन मुलाला रिंगण करून मारतानाचा हा व्हिडीओ संतापजनक आहे. यावेळी मारणाऱ्या मुलांनी त्याचे पैसे, मोबाइलही हिसकावून घेतल्याचं कळतंय.
घटना नेमकी काय?
व्हिडीओमध्ये अल्पवयीन तरूणांचं एक टोळकं आणि त्यांच्या गाड्या दिसताय. यामध्ये टोळक्यातले मुलं एका मुलाला खाली पाडून लाथा, बुक्क्यांनी मारतायत. शिव्या देतायत. "बाळ्याला कुणी सांगितलं? लाव त्याला फोन आता, सांगतोस का बाळ्याला, बघायची का माझी पावर तुला? नरड्यावर पाय देईल तुझ्या.खल्लास करतो तुला दगड टाकून..." अशा धमक्या देत आहेत. यावेळी खाली पडलेला तरूण वेदनांनी विव्हळत राहिला. ज्या तरूणाला मारहाण होतेय, त्याचं नावही समोर आलंय.
मुलाचे वडील आणि काका काय म्हणाले?
दलित समाजाच्या मुलावर एवढा अत्याचार झाला. आरोपींचा जीवे मारण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्या घटनेतून हा युवक वाचला. गृहमंत्री फडणवीस, अंजली दमानिया, दीपक केदार यांना विनंती आहे, आम्हाला न्याया मिळवून द्यावा. आरोपी अल्पवयीन असो किंवा 18 वर्ष पूर्ण झालेले असो. पण आम्हाला न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा व्हावा. आम्हालाही मारहाणीचा प्रयत्न झाला आहे, आमचं एकच घर आहे असं मुलाचे वडील आणि काका म्हणाले आहेत.