हार्मोनल असंतुलन अन् नैराश्य..., महिलेने पोटच्या 4 महिन्यांच्या जुळ्या मुलींसोबत काय केलं?
Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये 40 वर्षीय महिलेने चार महिन्यांच्या जुळ्या मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलींच्या हत्येनंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
हार्मोनल असंतुलन अन् नैराश्य...,
महिलेने पोटच्या 4 महिन्यांच्या जुळ्या मुलींसोबत काय केलं?
Bengaluru Crime News : बंगळुरूमध्ये चार महिन्यांच्या जुळ्या मुलींची हत्या केल्याच्या आरोपावरून 40 वर्षीय महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलींची हत्या केल्यानंतर महिलेने स्वतःचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. पतीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे तालाघट्टापुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेत मृत झालेल्या दोन्ही मुली चार महिन्यांच्या होत्या.
हेही वाचा : सातारा : वॉशरुममध्ये अश्लील शब्द, पालकांना बोलवण्याची चर्चा अन् तरुणीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी
हार्मोनल असंतुलन अन् नैराश्य ..महिलेने उचललं भयंकर पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा देवी या महिलेवर प्रसूतीनंतर मानसिक उपचार सुरू होते. डॉक्टरांनी तिच्या कुटुंबीयांना तिच्या वर्तनामागे प्रसूतीनंतरचे नैराश्य आणि बाळाच्या जन्मानंतर झालेल्या हार्मोनल असंतुलनाचा संबंध असल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. उमा देवी या तिचे पती रामलिंगप्पा, जुळ्या मुली आणि सासूसोबत वजारहल्ली येथे राहत होत्या. रामलिंगप्पा हे रिअल इस्टेट व्यवसायात असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे 2002 मध्ये उमा देवी यांच्याशी लग्न झाले होते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुरळीत होते.
हेही वाचा : डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण, काय घडलं? VIDEO
