3 लेकरांची आई प्रियकराची प्रेमात आकंठ बुडाली, पतीला धारदार शस्त्रांनी कापून काढलं
Bihar Crime News : पतीची झोपेत असताना धारदार शस्त्राने हत्या करून मृतदेहाची ओळख लपवण्यासाठी तो नग्न अवस्थेत कालव्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नीने प्रियकराच्या मदतीने हा कट रचल्याचं समोर आलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
3 लेकरांची आई प्रियकराची प्रेमात आकंठ बुडाली
पतीला धारदार शस्त्रांनी कापून काढलं
Bihar Crime News : बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील काराकाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. तीन मुलांची आई असलेल्या महिलेने तिच्या कथित प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीची झोपेत धारदार शस्त्राने हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी मृताच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत कालव्यात फेकण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराला अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
हेही वाचा : मैत्रिणीच्या पार्टीत महिलेवर लैंगिक अत्याचार, एक्स बॉयफ्रेंडकडून 'तसले' व्हिडिओ शेअर करण्याची धमकी
प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने पतीची हत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहतास जिल्ह्यातील काराकाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डेरा चंडी गावात राहणारे वीरेंद्र सिंह आपल्या कुटुंबासह सामान्य आयुष्य जगत होते. याच काळात त्यांची गावातील अरविंद सिंह याच्याशी मैत्री झाली. अरविंदचे घरात येणे-जाणे वाढल्यानंतर वीरेंद्र सिंह यांची पत्नी ममता देवी आणि अरविंद सिंह यांच्यात कथित प्रेमसंबंध निर्माण झाल्याचे तपासात समोर आले आहे. पती या संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्याला कायमचा हटवण्याचा कट दोघांनी रचल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
हेही वाचा : AI च्या मदतीने लिहिली तिहेरी हत्याकांडाची स्क्रिप्ट, लिव्ह-इन पार्टनरच्या मदतीने रचला कट, हादरवणारी कहाणी
