Sana Khan Murder : भाऊ म्हणाला ‘ही सना खान नाही’, मग ‘तो’ मृतदेह कुणाचा?
Sana Khan Murder : भाजप अल्पसंख्याक मोर्चाची पदाधिकारी सना खान हिची हत्या करण्यात आलीये. मात्र, अद्याप तिचा मृतदेह सापडलेला नाही.
ADVERTISEMENT

Sana Khan Murder : नागपूर येथील भाजप पदाधिकारी सना खानच्या हत्येनंतर पोलिसांना सनाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. मृतदेहाच्या शोधात गुंतलेल्या बचाव पथकाने हिरण नदीच्या अनेक किलोमीटर परिसरात शोधमोहीम राबवली. अद्याप तरी मृतदेहाचा कोणताही सुगावा त्यांना लागला नाही. यानंतर शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. (BJP leader Sana Khan’s murder mystery)
या हत्याकांडात आतापर्यंत कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दुसरीकडे, हरदा येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली, तेव्हा सनाच्या भावाने सांगितले की, हा मृतदेह त्याच्या बहिणीचा नाही. त्यामुळे सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा असा नवा पेच पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.
वाचा >> ‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
या हत्येचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे दोन अधिकारी जबलपूरमध्ये तळ ठोकून आहेत. आता पुरावे गोळा करण्यासाठी नागपूरहून फॉरेन्सिक टीम शहरात आहे. हे पथक आरोपी अमित साहूचे घर, ढाबा आणि कारची तपासणी करणार आहेत. सना खान 1 ऑगस्ट रोजी नागपूरहून जबलपूरला निघाली होती. 2 ऑगस्ट रोजी सकाळी ती पती अमित उर्फ पप्पू साहू याच्या बिल्हारी राजुल टाऊन येथील घरी पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर सनाचा पती अमित साहूसोबत वाद झाला.
या वादातून अमित साहूने सनावर काठीने वार करून तिची हत्या केली. हत्येनंतर अमितने राजेश सिंग या त्याच्या साथीदाराच्या मदतीने मृतदेह हिरण नदीत फेकून दिला. या प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या पोलिसांनी सनाचा पती अमित आणि त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांची कसून चौकशी केली.