सत्तेची मुजोरी! भाजप आमदाराने अधिकाऱ्यावर हात उगारला, नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

BJP MLA raised hand on officer video viral incident in Uttarakhand
BJP MLA raised hand on officer video viral incident in Uttarakhand
social share
google news

Uttarakhand News: उत्तराखंडमध्ये सत्तेची नशा इतक्या लवकर नेत्यांच्या डोक्यात गेली आहे की, त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवरच हात उगारला आहे. कारण येथील एका आमदाराने सरकारी अधिकाऱ्यावर हात उचलला आहे. कोटद्वारमध्ये घडलेल्या घटनेने भाजप आमदाराला आलेली सत्तेची नशा एका व्हिडीओद्वारे प्रचंड व्हायरल (Video Viral) झाले आहे. त्या व्हिडीओमध्ये लॅन्सडाउनचे भाजप आमदार महंत दिलीप सिंग रावत यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला दंड ठोठावला होता. त्यामुळे परिवहन विभागाचे अधिकारी हरीश चंद्र सती यांच्यावर त्यांनी हात उगारत आपला संताप व्यक्त केला आहे.

आमदाराचा संताप

भाजपच्या आमदाराने एका अधिकाऱ्यावर हात उगारल्याचा तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अधिकारी आणि आमदारांच्या बाचाबाचीचा व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, ते आमदार किती संतापले होते. कार्यकर्त्याला दंड ठोठवण्यात आल्यामुळे त्यांनी थेट अधिकाऱ्यावरच हात उगारला आहे. त्यांना शिवीगाळ करण्यातही त्यांनी जरासुद्धा कसूर घेतली नाही.

हे ही वाचा >> MP Assembly Election Results 2023: मध्य प्रदेशमध्ये जनतेने काँग्रेसला थेट नाकारलं, भाजपच्या हाती पुन्हा सत्तेच्या चाव्या

कायद्याने वागणाऱ्यावरच अन्याय

आमदाराच्या एका कार्यकर्त्याला नियमानुसार वाहतुकीच्या नियमाखाली त्याला दंड ठोठवण्यात आला होता. कार्यकर्त्याला दंड ठोठवण्यात आल्यानंतर आमदाराने थेट अधिकाऱ्यांसमोर जात त्यांनी त्यांच्यावर हात उगारला. आमदाराने वाद घालायला चालू केल्यावर अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही नियमानुसार त्यांना दंड ठोठवला आहे, तरीही आमदाराने त्यांचे ऐकून न घेता त्यांनी त्यांच्या धावून जाण्याचा प्रकार केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

व्हिडीओ व्हायरल

आमदाराने अधिकाऱ्यावर केलेली अरेरावीचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असला तरी ज्या अधिकाऱ्यावर हात उगारण्यात आला आहे ते अजून माध्यमांसमोर आले नाहीत. अथवा त्यांनी त्याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल होताच आमदार आणि त्यांच्या समर्थकांची डोकेदुखी वाढली आहे. नियमानुसार राहणाऱ्या अधिकाऱ्यावरही एक आमदार कसा दादागिरी करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आमदाराबरोबरच भाजपवरही टीका होऊ लागली आहे. त्यामुळे आता भाजपकडून स्पष्टीकरण दिले जात आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Election Results 2023: निकालानंतर संजय राऊत रोखठोकच बोलले, ‘काँग्रेसला आता…’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT