गर्लफ्रेंडला OYOवर घेऊन गेला अन् तिच्या नवऱ्याला केला Video कॉल…

मुंबई तक

ADVERTISEMENT

boyfriend killed married girlfriend in oyo hotel and commits suicide in ghaziabad
boyfriend killed married girlfriend in oyo hotel and commits suicide in ghaziabad
social share
google news

Boyfriend killed married girlfriend in oyo hotel : देशभरात अनैतिक संबंधाच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढले आहे. आता अशीच घटना समोर आली आहे. या घटनेत एका जोडप्याने ओयो रूमवर (oyo hotel) जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील तरूणीचे (girlfriend) लग्न झाले होते, तर तरूण हा तिचा बॉयफ्रेंड होता. विशेष म्हणजे या दोघांनी आत्महत्येपूर्वी तरूणीच्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल देखील केला होता, त्यानंतर टोकाचं पाऊल उचलंल होते. गाझियाबादच्या (ghaziabad) मोदीनगर कादराबाद परीसरात ही घटना घडली असून शहरात खळबळ माजली आहे. दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात.(boyfriend killed married girlfriend in oyo hotel and commits suicide in ghaziabad)

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनूसार, कादराबाद परीसरातील OYO हॉटेलमध्ये रविवारी हे जोडप दाखल झालं होते. या हॉटेलमध्ये रूम घेतल्यानंतर जोडप रुममध्ये गेले होते. या दरम्यान बॉयफ्रेंडने नवविवाहित तरूणीची गळा दाबून हत्या केली. या हत्येनंतर स्वत: लटकून गळफास लावून आत्महत्या केली होती. या आत्महत्येपुर्वी बॉयफ्रेंडने (Boyfriend) तरूणीच्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल करून या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती. यानंतर दोघांनी टोकाच पाऊल उचलंल होते. तरूणीच्या पतीला या घटनेची माहिती मिळताच त्याने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तत्काळ तपास करून OYO हॉटेलचा शोध लावून घटनास्थळी दाखल झाले होते.

हे ही वाचा : Crime: बॅगेत सापडली मुंडकं नसलेली महिला.., टॅटूमुळे सापडले नराधम मारेकरी

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला.तसेच मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवले होते. मृत तरूण हा मेरठ जिल्ह्याचा असून त्याचे वय 20 वर्ष आहे, तर विवाहित तरूणीचे वय 22 वर्ष आहे, ती हापुडची रहिवासी असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेतील तरूणाचे लग्न झाले नव्हते तर त्याची गर्लफ्रेंडही विवाहित होती. दोघेही तरूणीच्या लग्नापुर्वीपासून एकमेकांना ओळखायचे. तरूणीचे लग्न हे हिमांशु गावात झाले होते. या लग्नानंतर देखील तरूणीचे तरूणासोबत प्रेमसंबंध होते.

हे वाचलं का?

रविवारी तरूण तिच्या नवविवाहित गर्लफ्रेंडला औषध देण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन आला होता. यावेळी तरूण गर्लफ्रेंडला ओयो रूमवर घेऊन गेला. आणि त्याने तरूणीची हत्या करून तिच्या पतीला व्हिडिओ कॉल करून याबाबतची माहिती दिली होती. या संपूर्ण घटनेने ओयो हॉटेलमध्ये खळबळ माजली होती. या संपूर्ण घटनेचा आता तपास सुरू आहे.

हे ही वाचा :  लव्ह आणि लिव्ह-इन… गर्लफ्रेंडकडून प्रियकराची निर्दयीपणे हत्या

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT