Crime : माहेरी आलेल्या प्रेयसीला घरी बोलावलं अन्… प्रियकराच्या कृतीने सातारा हादरलं
Boyfriend killing his newly married girlfriend: सातारा: प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने (Boyfriend) आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे काल (रविवारी) घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून घडल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (boyfriend suicide by killing his newly married girlfriend sensational incident in […]
ADVERTISEMENT
Boyfriend killing his newly married girlfriend: सातारा: प्रेम प्रकरणातून नवविवाहितेचा खून करून प्रेमवीराने (Boyfriend) आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना सातारा (Satara) जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वांझोळी येथे काल (रविवारी) घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला असून घडल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. (boyfriend suicide by killing his newly married girlfriend sensational incident in satara)
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
स्नेहल वैभव माळी (वय 22 वर्ष) असे खून झालेल्या नवविवाहितेचे नाव असून दत्तात्रय सुरेश माळी (वय 27 वर्ष) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या प्रेमवीराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वांझोळी येथील दत्तात्रय माळी आणि स्नेहल यांचे एकमेकांवर प्रेम होते. पण काही महिन्यांपूर्वीच स्नेहल हिचा शामगाव येथील युवकाशी विवाह झाला होता. शामगाव हे तिचे सासर असून दोन महिन्यानंतर ती शनिवारी आपल्या माहेरी वांझोळीत आली होती.
हे वाचलं का?
Ulhasnagar: पत्नीशी अवैध संबंधाच संशय, मोठ्या भावाच्या डोक्यात दगड घालून हत्या
दत्तात्रय आणि स्नेहलचे घर काही अंतरावर आहे. रविवारी सायंकाळी दत्तात्रय याने ‘मला तुझ्याशी काही बोलायचे आहे’, असे सांगून स्नेहलला आपल्या घरी बोलावून घेतले होते. दरम्यान, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दत्तात्रय याने स्नेहल हिच्यावर चाकू आणि कोयत्याने सपासप वार केले. स्नेहलला वर्मी घाव बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर याने ही घरातट गळफास घेऊन आत्महत्या करत आपलं जीवन संपवले आहे.
ADVERTISEMENT
दत्तात्रय आणि स्नेहलमध्ये प्रेमसंबंध असल्याने दत्तात्रयला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. मात्र, स्नेहलचं लग्न शामगाव येथील तरुणाशी झाला. ज्याचा राग दत्तात्रयचा मनात होता. त्यामुळेच जेव्हा स्नेहल ही वांझोळीला आपल्या माहेरी आली तेव्हा संधी साधून दत्तात्रयने आपल्या घरात बोलावून तिची अतिशय निर्घृणपणे हत्या केली.
ADVERTISEMENT
Crime : नांदेड शहरात 22 वर्षीय तरुणाची हत्या; हे कारण येतंय समोर
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच औंध आणि पुसेसावळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, सपोनि दत्तात्रय दराडे यांनी टीमसह घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा ठसेतज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आलं. या घटनेची नोंद औंध पोलिसात करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT