तरुणाचा सातवीतल्या विद्यार्थिनीसह गळफास, बापानेही उचललं टोकाचं पाऊलं; बुलढाणा हादरलं!

ADVERTISEMENT

Buldhana district sakhar kherda suicide of young man along minor girl suicide father
Buldhana district sakhar kherda suicide of young man along minor girl suicide father
social share
google news

Suicide Case : बुलढाणा जिल्ह्यातील साखर खेर्डा (Sakhar Kherda) गावाबाहेर कडुलिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत तरुण आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, झाडाला लटकलेल्या अवस्थेत दोन मृतदेहांपैकी एक मृतदेह 22 वर्षाचा तरुण असून अल्पवयीन मुलीचा दुसरा मृतदेह आहे. तिच वय 13 असून ती सातवीत शिकत असल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील मुलाच्या वडिलांनीही आत्महत्या (Suicide) केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गावाबाहेर आढळले मृतदेह

साखरखेर्डाचे पोलीस अधिकारी स्वप्नील सरनाईक यांनी लटकलेल्या अवस्थेत मिळालेल्या मृतदेहांची माहिती सांगताना म्हणाले की, साखरखेर्डा गावाबाहेर कडूलिंबाच्या झाडाला मुलचा आणि अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी हे दोन्ही मृतदेह झाडावरून खाली उतरवून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगितले.

हे ही वाचा >> Mumbai Crime : मुंबई गँगवारने हादरली! चुनाभट्टी परिसरात अंदाधूंद गोळीबार; एक ठार, तीन जखमी

मुलगी होती बेपत्ता

ज्या दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामधील मुलगी अल्पवयीन असून तिचे वय 13 वर्षे होते. ती सातवीत शिकत होती. मात्र गेल्या 4 दिवसांपासून ती घरातून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या आईने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी मुलगी बेपत्ता असून अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यानंतर तीन दिवस पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते, मात्र त्यानंत 22 डिसेंबर रोजी सायंकाळी दोघांचेही मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लागोपाठ तिघांची आत्महत्या

या प्रकरणात अल्पवयीन मुलीबरोबर ज्या तरुणाने आत्महत्या केली आहे, त्याच्या वडिलानीही आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात तीन लोकांनी आत्महत्या केल्याने कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे. तिघांनी पाठोपाठ आत्महत्या केल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

हे ही वाचा >> Ad Hock Committee : अब दंगल होगा! WFI च्या बरखास्तीनंतर नेमली ॲड हॉक कमिटी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT