बिहार ते महाराष्ट्र, 59 मुलांची तस्करी, पोलिसांना हाणून पाडला तस्करीचा डाव
Nashik Child Trafficking : बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातून मदरशाच्या नावाखाली 59 मुलांची सांगलीत (Sangli) तस्करी करण्यात येणार होती.ट्रेनमधून 59 मुलांच्या तस्करीचा डाव (Child Trafficking) रचला गेला होता. मात्र आरपीएफ पोलिसांनी ट्रेनची तपासणी करून हा तस्करीचा डाव हाणून पाडला आहे.
ADVERTISEMENT
Nashik Child Trafficking : बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यातून मदरशाच्या नावाखाली 59 मुलांची सांगलीत (Sangli) तस्करी करण्यात येणार होती.ट्रेनमधून 59 मुलांच्या तस्करीचा डाव (Child Trafficking) रचला गेला होता. मात्र आरपीएफ पोलिसांनी ट्रेनची तपासणी करून हा तस्करीचा डाव हाणून पाडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Police) एका संशयीताला ताब्यात घेतले असून 59 मुलांची सुखरूप सुटका केली आहे. दरम्यान आता या मुलांना जळगाव आणि नाशिक येथील बाल सुरक्षा गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे. तसेच कायदेशीर प्रक्रियेनंतर संबंधित बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांनी दिली आहे. (child trafficking in the name of madrasa 59 children were rescued from the danapur express)
ADVERTISEMENT
पुर्णिया जिल्ह्यातील 59 मुलांची सांगलीच्या (Sangli) मदरशामध्ये तस्करी करण्यात येणार होती. या मुलांना (Danapur- Pune Express) दानापूर-पुणे एक्सप्रेस रेल्वे नंबर 01040 या गाडीतून नेत तस्करीचा प्लान (Child Trafficking) आखला गेला होता.या तस्करीची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी एक्सप्रेसची तपासणी करायला सुरुवात केली होती. यावेळी बाल तस्करी होत असल्याच्या माहितीवरून आरपीएफ, जीआरपी या पोलिसांच्या संयुक्त टीमने धडक कारवाई केली. भुसावळ येथील एका सामाजिक संस्थेच्या सहकार्याने सदर एक्सप्रेस स्टेशनवर आल्यानंतर त्याची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या डब्यांमधून 8 ते 15 वयोगटातील 29 मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व मुलांना रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यासोबत असणाऱ्या एका संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे ही वाचा : Sakshi Murder Case : वेब सीरिजने दिली क्रूर कटाची आयडिया, हत्येपूर्वी साहिलने काय केलं?
59 मुलांची बालरक्षक गृहामध्ये रवानगी
तसेच या कारवाईत मनमाडपर्यंत पुढील तपासणी दरम्यान शोध मोहीममध्ये आणखी 30 मुले आणि 4 संशयित तस्करांची ओळख पटली. त्यांना मनमाड स्टेशनवर ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान भुसावळ येथे मिळून आलेल्या 29 मुलांना जळगाव येथील बाल निरीक्षण गृहामध्ये काळजी घेण्यासाठी पाठवण्यात आले असून मनमाड येथील 30 मुलांना देखील नाशिकच्या बालरक्षक गृहामध्ये रवाना करण्यात आले आहे.
हे वाचलं का?
मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये सदर बालकांची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे. सदर मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच पाचही संशयित तस्करांविरुद्ध भुसावळ आणि मनमाड पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या मुलांच्या पालकांची माहिती काढली जात असून ओळख पटविल्यानंतर संबंधित बालकांना पुढील आठवड्यापर्यंत ताब्यात देण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव यांनी दिली. ही कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त श्रीनिवास राव, सहाय्यक सुरक्षा आयुक्त कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केली आहे..
हे ही वाचा : आधी मैत्री नंतर लग्नाचे आमीष दाखवून…,घटनाक्रमाने पोलीसही हादरले
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT