धावत्या बसमध्ये कंडक्टरचा चिरला गळा, तरुणाच्या कृत्याने प्रवासी हादरले
चालत्या बसमध्ये कंडक्टर आणि एका अभियांत्रिकी करणाऱ्या विद्यार्थ्याचे वाद झाले. त्या वादातून भरलेल्या बसमध्ये विद्यार्थ्याने चाकूने कंडक्टरवर हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यानंतर हल्ला का केला त्याचा व्हिडीओ विद्यार्थ्याने करुन तो सोशल मीडियावर व्हायरलही केला आहे.
ADVERTISEMENT
UP Crime : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. चालत्या बसमध्ये (Bus) एका तरुणाने बस कंडक्टरवर हल्ला (Attack) करुन पळ काढला आहे. जखमी बस कंडक्टरला (Bus Conductor) प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यानंतर आरोपी इंजिनिअरिंगला असलेल्या विद्यार्थ्याने व्हिडीओ (Video) करून सोशल मीडियावर (Social Media) त्याने व्हायरल केला आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांचाही विद्यार्थ्यावर गोळीबार
हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याने कंडक्टरवर हल्ला का केला त्याचे कारण त्या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी युवकाला ताब्यात घेऊन अटकही केली आहे. त्याच्याकडील हत्यारं जप्त करण्यासाठी पोलीस गेलेले असताना पोलिसांवरही त्याने गोळीबार केला आहे. त्यानंतर प्रत्युत्तरदाखल पोलिसांनीही गोळीबार केल्याने पायाला गोळी लागून तो जखमी झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे.
मानेवर केला हल्ला
इलेक्ट्रॉनिक बसमधून इंजिनीअरिंगचा विद्यार्थी लरेब हाश्मी प्रवास करत होता. त्यावेळी त्याचे आणि बस कंडक्टर हरिकेश विश्वकर्मा यांच्यामध्ये तिकीटावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, लरेब हाश्मी या विद्यार्थ्याने बस कंडक्टर विश्वकर्मावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात विश्वकर्मा यांच्या मानेला आणि हाताल गंभीर दुखापत झाल्याने प्रचंड रक्तस्त्राव झाला. बसमध्येच रक्ताचा सडा पडल्याने प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Crime : लग्नाच्या पहिल्याच रात्री घात, खिरीमध्ये गुंगीचे औषध मिसळून…लग्नघरात काय घडलं?
‘जमात अभी जिंदा है’ च्या घोषणा
ज्या बसमधून विद्यार्थी प्रवास करत होता, ती बस प्रयागराज नैनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच आरोपी विद्यार्थ्याने कंडक्टरवर चढवला. यावेळी कोणाला काही कळण्याआधीच विद्यार्थ्याने चालकाला काही समजण्यापूर्वीच त्याने पळ काढला. यावेळी प्रवाशांनी सांगितले की, त्याने पळून जाताना अल्लाह हू अकबर आणि जमात अभी जिंदा हैच्या घोषणाही दिल्या होत्या. यावेळी तो विद्यार्थी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचेही नाव घेत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
पोलिसांवरही केला गोळीबार
या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी लरेब हाश्मीला अटक करुन त्याला पोलीस स्टेशनमध्ये हजर केले. त्याच्याकडील हत्यारं जप्त करताना त्याने लपवून ठेवलेल्या पिस्तुलमधून पोलिसांवर थेट गोळीबार केला. त्याने गोळीबार करताच पोलिसांनीही त्याच्यावर गोळीबार केला तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी प्रयागराज येथील एसआरएन रुग्णालयात दाखल केले आहे.
ADVERTISEMENT
वाद नेमका कशाचा
पोलिसांनी सांगितले की, पहिल्यांदा हा वाद बस कंडक्टर आणि तिकीटवरुन झाल्याचे वाटत होते. मात्र नंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आरोपी म्हणत आहे की, तो आमच्या रसूलल्लालाविषयी त्याने चुकीचे वक्तव्य केले होते. त्यामुळे मी त्याच्यावर हल्ला केल्याचे तो सांगत आहे. त्यामुळे पोलीस आता पुढील चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> ”आरक्षण हवंय, पण बाबासाहेबांच नाव घ्यायचं नाही”, गोपिचंद पडळकरांनी जरांगेंना सुनावलं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT