भररस्त्यात डिलिव्हरी बॉयचं गायीसोबत अनैसर्गिक कृत्य, सीसीटीव्हीत भयंकर..
Crime New : एका व्यक्तीने आजूबाजूची गर्दी कमी होण्याची वाट पाहिली आणि गायीसोबत अनैसर्गिक कृत्य केलं, नंतर तिथून तो फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्हीचा तपास करत आरोपीवर कारवाई करत मुसक्या आवळल्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गायीसोबत अनैसर्गिक कृत्य
आलमवर गुन्हा दाखल
Crime New : बंगळूरूतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, एका व्यक्तीने आजूबाजूची गर्दी कमी होण्याची वाट पाहिली आणि गायीसोबत अनैसर्गिक कृत्य केलं, नंतर तिथून तो फरार झाला. बंगळूरू शहर पोलिसांनी प्रकरणाची माहिती घेत सांगितलं की, अक्कीपेटे येथील एका रस्त्याच्या कडेला डिलिव्हरी बॉयने अनैसर्गिक कृत्य केलं होतं. या प्रकरणी आता 24 वर्षीय डिलिव्हरी बॉयच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा : सांगलीत 69 वर्षीय वृद्धाचा दगडाने ठेचून खून, अल्पवयीन तिघांचा समावेश
घडलेल्या घटनेनुसार, आरोपीची ओळख शहबाज आलम अशी समोर आली. आलमवर 17 मे रोजी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, हे प्रकरण 5 मे रोजी अंदाजे 1:47 वाजतादम्यान घडली होती. हे प्रकरण कॉटनपेट पोलीस ठाणे परिसरातील अक्कीपेट गल्ली रोडवर घडल्याचे वृत्त आहे.
डिलिव्हरी बॉयचं गायीसोबत अश्लील कृत्य
फुटेजमध्ये आरोपी दुचाकीवरून येऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या गायीजवळ थांबलेला दिसून येत आहे. रस्ता रिकामा होण्याची तो वाट पाहू लागला होता. त्याने गायीसोबत अश्लील कृत्य करून घटनास्थळावरून धाव घेतली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. कॉटनपेट पोलीस ठाणे परिसरात निगराणी पथकाने फुटेजची तपासणी करत पुष्टी केली आणि घटनास्थळाची ओळख पटवली.
हे ही वाचा : दादा गटाचे 'ते' 22 आमदार अन् शरद पवारांचं सूचक मौन; NCP SP च्या बैठकीत काय घडलं?
आलमवर गुन्हा दाखल
या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी तपास करून सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संबंधित डिलिव्हरी बॉयचा शोध घेतला. नंतर सोमवारी आलमला न्यायालयीन कोठडी सुनावली. संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान, आलमवर प्राणी क्रूरता अंतर्गत कायद्याच्या कलम 11 आणि भारतीय दंडसंहिता कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









