Crime News : शाळेच्या व्यवस्थापकाने शिक्षिकेला एकटेच शाळेत बोलावलं अन्...
Crime News : उत्तर प्रदेशातील सहारनपूरातील पोलीस ठाणे परिसरातील एक महिला शिक्षिकेवर अत्याचार करण्यात आला. ही घटना 22 मे रोजी घडली आहे. पोलिसांनी यावर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उत्तर प्रदेशातील सहारनपूरातील पोलीस ठाणे परिसरातील एक महिला शिक्षिकेवर अत्याचार करण्यात आला.

ही घटना 22 मे रोजी घडली आहे.

पोलिसांनी यावर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
Crime News : उत्तर प्रदेशातील सहारनपूरातील पोलीस ठाणे परिसरातील देवबंद येथे एक महिला शिक्षिकेवर अत्याचार करण्यात आला. ही घटना 22 मे रोजी घडली आहे. या प्रकरणात पीडितेनं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी यावर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. अशावेळी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
हेही वाचा : Vaishnavi Hagawane Case: सुनांना मरणयातना देणाऱ्या हगवणेंचा भलताच उद्योग, बैलासमोर नाचवलेलं गौतमी पाटीलला!
पीडित आरोपीने तक्रार करत सांगितलं की, सराय मालिया हे देवबंद पोलीस ठाण्याचे प्रबंधक आहेत. आरोपी संदीप हा दिव्य ज्ञान पब्लिक स्कूल या शाळेचा व्यवस्थापक आहे. पीडित शिक्षिकेने आरोप केला की, संदीपने शाळेला सुट्ट असताना तिला भेटण्यासाठी एकटे बोलावले. दरम्यान आरोप करण्यात आला की, संदीपने धारदार शस्त्र दाखवत पीडितेला धमकावण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर अत्याचार केला. अशातच आता या प्रकरणाची तपासणी सुरु करण्यात आली आहे.
सहारनपुरचे वरिष्ठ अधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक आरोपी संदीपला या घटनेदिवशीच अटक करण्यात आली. आरोपीच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपीला न्यायालयात दाखल करण्यात आले होते, तसेच आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
यानंतर पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर साक्षीदारांच्या आधारावर या प्रकरणाचा तपास करण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान, एसपी सागर जैन यांनी मोठं भाष्य केलं आहे.
हेही वाचा : रोहित आणि विराटच्या निवृत्तीनंतर इंग्लंडदौऱ्यासाठी टीम इंडिया सज्ज, बीसीसीआयकडून खेळाडूंची घोषणा
नेमकं काय म्हणाले सागर जैन?
एसपी सागर जैन यांनी घडलेल्या घटनेचा घटनाक्रम थोडक्यात सांगितला आहे. 22 मे रोजी देवबंद ठाणे परिसरात एका महिला शिक्षिकेवर आत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. फिर्यादीत त्यांनी लिहिलं की, मला शाळेत बोलावून धारदार शस्त्र दाखव अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा खोलवर तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.