महिला क्रिकेटपटूसह तिच्या भावाला सेक्सटॉर्शन प्रकरणात अटक, ब्लॅकमेल करत 40 लाख रुपयांची फसवणूक; चॅट व्हायरल...
Crime News : क्रीडा विश्वातून एक खळबळनजक प्रकार उघडकीस आला आहे. महिला क्रिकेटपटूला तिच्या भावासह, कथित सेक्सटॉर्शन आणि खंडणीच्या प्रकरणात मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणात सामील असलेले तिचे साथीदारांवरही कारवाई करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोशल मीडियावरती मैत्री, त्यानंतर 40 लाख रुपयांची सेक्सटॉर्शन
चॅट व्हायरल करण्याची धमकी
Crime News : क्रीडा विश्वातून एक खळबळनजक प्रकार उघडकीस आला आहे. जम्मू आणि काश्मीर टी 20 लीगशी संबंधित एका महिला क्रिकेटपटूला तिच्या भावासह, कथित सेक्सटॉर्शन आणि खंडणीच्या प्रकरणात मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या प्रकरणात सामील असलेले तिचे साथीदार, उद्दीन इम्तियाज वाणी (वय 22), याला जम्मू आणि काश्मीर येथून अटक केली. तसेच फरखुंद खान (वय 30) आणि तिचा भाऊ ब्राझिल खान (वय 27) याला देखील अटक केली, या घटनेनं क्रिकेट विश्व हादरून गेलं आहे.
हे ही वाचा : नांदेड : माय लेकासह आत्यावर काळाचा घाला, कार-दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी अंत, दोघांची प्रकृती चिंताजनक
सोशल मीडियावरती मैत्री, नंतर 40 लाख रुपयांची सेक्सटॉर्शन
संबंधित प्रकरणातील तक्रारदार, जो एक व्यवसायिक आहे. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याची फरखंदाशी 2023 मध्ये भेट झाली होती. दोघांमधील संवाद वाढला आणि त्यांची मैत्री झाली. तेव्हा फरखंदाने कॉल रेकॉर्ड करत त्याचे चॅट्सचे स्क्रीनशॉट आपल्याकडे ठेवले. यानंतर रेकॉर्डिंग्स व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली.
चॅट व्हायरल करण्याची धमकी
भीतीने पीडित व्यक्तीने सुरुवातीला 23. 61 लाख रुपयांची मागणी करण्यास सुरुवात केली. फरखंदाचा भाऊ आणि त्याच्या मित्राने चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली होती. अधिक पैशांच्या मागणीची त्यांनी सुरुवात केली. पीडित व्यक्तीने रोख आणि ऑनलाइन व्यवहारातून अंदाजे एकूण 40 लाख रुपये दिले.
हे ही वाचा : अनैतिक संबंधाचा संशय, 48 वर्षीय नवऱ्याने 52 वर्षीय बायकोवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवलं, प्रकरणाला वेगळं वळण
तक्रार मिळाल्यानंतर, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुप्तचर पथकाने तपास सुरु केला. या प्रकरणात वरील तिघांनाही अटक करण्यात आली. पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत. या लोकांनी आणखी किती जणांना अशा पद्धतीने टार्गेट केलं, याचा ते तपास करत आहेत.









