सावत्र आईसोबत अनैतिक संबंध, पत्नीला समजताच पतीने निर्जनस्थळी नेलं, अन्..
Crime News : सावत्र आईसोबत अनैतिक संबंध, पत्नीला समजताच पतीने निर्जनस्थळी नेलं, अन्..
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सावत्र आईसोबत अनैतिक संबंध

पत्नीला समजताच पतीने निर्जनस्थळी नेलं, अन्..
Crime News : बिहारच्या गयाजी जिल्ह्यातील सीढ गावातून मंगळवारी रात्री एका धक्कादायक घटना समोर आली आहे. रीना देवी या 30 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या खुनाचा आरोपी तिचा पती श्याम ठाकुर आहे. प्राथमिक चौकशीत समोर आले आहे की, श्याचे सावत्र आईसोबत अनैतिक संबंध होते आणि पत्नी रीना या संबंधाला विरोध करत होती. पत्नीला त्यांच्या अनैतिक संबंधातील अडथळा मानून श्यामने तिची हत्या केली.
निर्जनस्थळी नेऊन पत्नीवर गोळ्या झााडल्या
माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 2 वाजता श्यामने पत्नीला बाहेर फिरण्यासाठी जाऊ म्हणून गयाजी शहरात नेले. रात्री उशिरा बंधुबीघा-सीढ मार्गावरच्या निर्जन भागात त्याने अचानक पत्नीवर गोळी झाडली. बुधवारी पहाटे रीना देवीचा मृतदेह आढळल्याने स्थानिकांनी घटनास्थळी पोलिसांना माहिती देण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन उचलला गेला नाही. नंतर डीएसपी सुरेंद्र कुमार सिंह यांना माहिती देण्यात आली आणि ते घटनास्थळी पोहोचले.
हेही वाचा : दिवाळी बोनस म्हणून सोन पापडी दिली, संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट समोर बॉक्स फेकले
मृत महिलेचा 10 वर्षीय मुलगा शुभमने पोलिसांना सांगितले की, “पप्पांनी पिस्टल आणले होते, त्याच्याद्वारे आईला मारले.” मुलाच्या विधानानंतर पोलिसांनी आरोपीची शोधाशोध सुरू केली आणि झारखंडच्या धनबाद रेल्वे स्थानकावरून श्याम ठाकुरला अटक केली. प्राथमिक चौकशीत समोर आले की, श्यामचे सावत्र आईशी अनैतिक संबंध होते आणि रीना देवीने या संबंधावर विरोध दर्शवला होता. पत्नीच्या विरोधामुळेच श्यामने हा खून केला, असा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे.