'माझ्यामागे तुझ्यासारखे 50 जण..', बायकोचे शब्द नवऱ्याच्या जिव्हारी; उचललं टोकाचं पाऊल

मुंबई तक

Crime News : माझ्या मागे तुझ्यासारखे 50 जण लागले आहेत... पत्नीच्या अशा वक्तव्याने नवरा व्यथित झाला की, त्याने टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवलं. या घटनेनं गाव हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद...
'व्हॅलेंटाइन डे'ला होणाऱ्या नवऱ्यासोबत वाद...
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं? 

point

'माझ्यामागे तुझ्यासारखे 50 लोक...'

Crime News : माझ्या मागे तुझ्यासारखे 50 जण लागले आहेत... पत्नीच्या अशा वक्तव्याने नवरा व्यथित झाला की, त्याने टोकाचं पाऊल उचलून जीवन संपवलं. या घटनेनं गाव हादरून गेला आहे. अशातच कुटुंबाने या प्रसंगी कोणतीही कारवाई केली नाही. पुढील कोणतीही कारवाई न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. हा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील आदमपूर येथील अमरोहा परिसरातील आहे. 

हे ही वाचा : पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनाची मंत्री संजय राठोड यांच्याकडून चेष्टा

नेमकं काय घडलं? 

एका तरुणाने काही दिवसांपूर्वी सैदनवली पोलीस ठाणे पसिरातील गावातील महिलेशी विवाह केला होता. घडलेल्या घटनेनुसार, लग्नापासून पती-पत्नीमध्ये मतभेद सुरू होते. बुधवारी सायंकाळी त्यांच्यात मोठा वाद झाला होता. वाद इतका वाढला की, पत्नीने थेट आपल्या पतीच्या जिव्हारी लागेल असे शब्द वापरले. 

'माझ्यामागे तुझ्यासारखे 50 लोक...'

पत्नी म्हणाली की, माझ्यामागे तुझ्यासारखे 50 लोक आहेत. हे ऐकून पती गप्पा बसला आणि रात्रीच्या वेळी उठून त्याने आपल्या खोलीत टोकाचं पाऊल उचललं. गुरुवारी पहाटे त्या तरुणाचा मृतदेह त्याच्या खोलीत फासाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, हे पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळपणे मृतदेह बाहेर काढला, मात्र तोवर होत्याचं नव्हतं होऊन बसलं होतं.

नवऱ्याच्या जिव्हारी पत्नीचे शब्द लागल्याने तो नाराज झाला. दरम्यान, मृत व्यक्ती हा दोन भावांहून धाकटा होता. तो आठवडी बाजारात कांदे, लसूण आणि कोथिंबीर विकून उदरनिर्वाह करत होता. त्या तरुणाच्या मृत्यूची बातमी मिळताच, महिलेचे आई-वडील आले आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेले होते. 

हे वाचलं का?