4 जणांकडून 10 महिने बलात्कार, बॉयफ्रेंडच काढायचा Video अन्...

मुंबई तक

Kolhapur Crime News: आधी मैत्री केली, हळूहळू प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्यानंतर तिचा विश्वास संपादन करुन तिच्यासोबतच्या लैंगिक संबंधाचे व्हिडीओ दाखवत तिला ब्लॅकमेल केलं. हे सगळं इथेच थांबलं नाही तर तिला ब्लॅकमेल करत तिच्या प्रियकरासह चार जणांनी तब्बल 10 महिने तिच्यावर बलात्कार केला.

ADVERTISEMENT

kolhapur crime boyfriend films obscene videos victim raped by 4 youths for eight months a shocking case
4 तरूणांकडून एकाच तरुणीवर वारंवार बलात्कार
google news

कोल्हापूर: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमाच्या नावाखाली एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ तयार करण्यात आले. त्यानंतर ते व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल दहा महिने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

ओळखीपासून प्रेमसंबंधांपर्यंत

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके हा राधानगरी परिसरात फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. ओळखपत्र तयार करून देण्याच्या निमित्ताने त्याची 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीशी ओळख झाली. कालांतराने या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले.

मात्र, या प्रेमसंबंधांच्या आड आरोपीचा वेगळाच हेतू असल्याचा आरोप आहे. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला एका ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर तिला मुरगुड परिसरातील तलावाजवळील झाडीमध्ये नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याच वेळी त्याने तिचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ मोबाइल व कॅमेऱ्यात शूट केल्याचे समोर आले आहे.

व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंग

फोटो आणि व्हिडिओ तयार केल्यानंतर आरोपीने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने तरुणीला ब्लॅकमेल करणे सुरू केले.

हे वाचलं का?