'सुनेने मारले आहे..' भिंतीवर 'तो' संदेश अन् करोडपती कुटुंबाचा शेवट, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

एका करोडपती कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे सर्वांचे मृतदेह कुलूपबंद घरात आढळले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

'सुनेने मारले आहे..'

point

भिंतीवर 'तो' संदेश अन् करोडपती कुटुंबाचा शेवट

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका करोडपती कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सर्वात आधी एका घरात तिघांचे मृतदेह आढळून आले, तर कुटुंबातील तरुण मुलगा बेपत्ता होता. पोलीस तपास सुरू असतानाच, त्याच दिवशी म्हणजे 2 जून रोजी संध्याकाळी उशिरा या बेपत्ता मुलाचाही मृतदेह आढळून आला. एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि आश्चर्याचे वातावरण पसरले आहे. उत्तर  प्रदेशातील प्रयागराज येथील ही घटना आहे.

'सुनेने मारले आहे'

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी घराचे प्रमुख 70 वर्षीय रवींद्र कुमार वैश्य, त्यांची 65 वर्षीय पत्नी अनिता आणि 45 वर्षीय मुलगी मीनाक्षी यांचे मृतदेह घरात आढळून आले होते. त्यानंतर शोध घेतला असता, उशीरा संध्याकाळी त्यांचा बेपत्ता असलेला 40 वर्षीय मुलगा अभिषेक याचाही मृतदेह सापडला. पोलिसांनी संपूर्ण घराची झडती घेतली असता, घराच्या भिंतींवर आणि एका बोर्डावर 'बंटी-बबली' आणि 'सुनेने मारले आहे' असे लिहिलेले आढळले. भिंतींवरील हा मजकूर आणि मृतदेहांच्या अंगावरील जखमांच्या खुणा पाहता, पोलिसांनी आता हा आत्महत्येचा नसून हत्येचा गुन्हा असावा या दृष्टीने तपास तीव्र केला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यात विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, 18 जिल्ह्यांवर संकट घोंगावणार

दुसरा मुलगा फसवणुकीच्या गुन्ह्यात तुरुंगात

मृत अभिषेकचा मृतदेह या कुटुंबाच्या मालकीच्याच एका दुकानात आढळून आला. वीरेंद्र कुमार वैश्य यांच्याच एका नातेवाईकाने या मृतदेहाची ओळख पटवली आहे. अभिषेकचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असून तो कुजलेल्या अवस्थेत तसेच फुगलेला होता. पोलिसांनी इतर तिघांप्रमाणेच त्याचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, मृत वीरेंद्र कुमार वैश्य यांचा दुसरा मुलगा अश्विनी वैश्य हा सध्या एका जुन्या फसवणुकीच्या गुन्ह्यात कौशांबी तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पोलिसांकडून आता अश्विनीच्या पत्नीबद्दल (सुनेबद्दल) अधिक माहिती गोळा केली जात आहे.

हे ही वाचा : Personal Finance: स्मार्ट बना, व्याज वाचवा! Credit Card बिल भरण्याची ही युक्ती बँक तुम्हाला कधीच नाही सांगणार!

बाहेरुन कुलूप, आत मृतदेह

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे फील्ड युनिट, डॉग स्क्वाड आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळावरून पुरावे गोळा करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या मते, मृतदेहांची अवस्था पाहता एखाद्या जड वस्तूने डोक्यावर किंवा शरीरावर प्रहार करून ही हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. तुरुंगात असलेला अश्विनी आणि मृत अभिषेक हे दोघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते आणि त्यांचे वडिलांशी सतत वाद होत असत. विशेष म्हणजे, ज्या घरात आणि दुकानात हे मृतदेह सापडले, त्यांना बाहेरून कुलूप लावलेले होते. पोलिसांनी हे कुलूप तोडूनच आत प्रवेश केला होता. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अजय पाल शर्मा यांनी या धक्कादायक प्रकरणाचा छडा लवकरच लावला जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?