ठाणे: आई प्रियकरासोबत राहायची, 4 वर्षाच्या निष्पाप मुलासोबत नेमकं काय घडलं?
Thane Crime News : ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा परिसरात एका चार वर्षांच्या निष्पाप मुलाची त्याच्या आईच्या प्रियकराने अमानुष मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाणे : आई प्रियकरासोबत राहायची
4 वर्षीय निष्पाप चिमुरड्याचा बळी गेला!
Thane Crime News: ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अतिशय संतापजनक घटना समोर आलीये. एका चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा त्याच्या आईच्या प्रियकराने अमानुष मारहाण करून जीव घेतलाय. शंभू शर्मा असे आरोपीचे नाव असून, तो मृत मुलाच्या आईसोबत राहत होता. आरोपीने मुलाला इतक्या क्रूरतेने मारहाण केली की त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेला नैसर्गिक मृत्यूचा मुलामा देण्याचा प्रयत्न आरोपीकडून करण्यात आला होता, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत प्रकरणाचा छडा लावला.
हेही वाचा : सोलापूर : बायकोच्या अनैतिक संबंधांना वैतागला, 6 मिनीटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला अन्...
मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या
घटनेच्या दिवशी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर, हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, काशिमीरा पोलिसांना या प्रकरणाबाबत संशय आल्याने त्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी पोलिसांना मुलाच्या शरीरावर मारहाणीच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालातून या मुलाचा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे शरीराच्या आतील भागांना गंभीर दुखापत झाल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : मित्रासोबत मिळून आधी प्रेयसीवर बलात्कार, नंतर पेट्रोल टाकून जाळलं; कारण काय?
आईचा प्रियकर शंभू शर्माला अटक
शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि संशयित शंभू शर्मा याला ताब्यात घेतले. कठोर चौकशी केल्यानंतर शंभू शर्माने आपणच या चार वर्षांच्या चिमुरड्याला मारहाण केल्याची कबुली दिली. त्यानंतर मंगळवारी काशिमीरा पोलिसांनी आरोपी शंभू शर्माविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या घटनेने काशिमीरा आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. आरोपीने चिमुकल्या मुलाला नेमक्या कोणत्या कारणावरून इतक्या भीषण पद्धतीने मारहाण केली, याचा शोध पोलीस घेत आहेत. तसेच, या घटनेच्या वेळी मुलाची आई कुठे होती आणि तिला या कथित गुन्ह्याबद्दल किंवा मारहाणीबद्दल काही कल्पना होती का? या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. या अमानुष कृत्यामुळे एका निष्पाप मुलाचा जीव गेला असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.









