जमिनीचा वाद विकोपाला, लहान जावेनं मोठ्या जावेचा चावला कान
crime news : कौटुंबिक वादातून लहान जावेनं आपल्या मोठ्या जावेच्या कानाचा चावा घेतल्याची घटना आहे. या कौटुंबीक वादाचं कारण समोर आलं आहे. 1000 रुपयांवरून दोघींमध्ये वाद झाला होता. या वादाने हिंसक रूप घेतल्याचं आढळून आलं होतं. संबंधित प्रकरणात लहान जावेनं थोरल्या जावेसोबत केलेल्या कृत्याने तिच्या कानाची स्थिती गंभीर असल्याची दिसून आली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलोपर्जीत जमिनीवरून वाद
धाकट्या जावेनं थोरलीच्या कानाचा घेतला चावा
Crime News : कौटुंबिक वादातून लहान जावेनं आपल्या मोठ्या जावेच्या कानाचा चावा घेतल्याची घटना आहे. या कौटुंबीक वादाचं कारण समोर आलं आहे. 1000 रुपयांवरून दोघींमध्ये वाद झाला होता. या वादाने हिंसक रूप घेतल्याचं आढळून आलं होतं. संबंधित प्रकरणात लहान जावेनं थोरल्या जावेसोबत केलेल्या कृत्याने तिच्या कानाची स्थिती गंभीर असल्याची दिसून आली होती. या घटनेनं कुटुंबातील वातावरण अस्थिर झालं आहे.
वडिलोपर्जीत जमिनीवरून वाद
गंभीर जखमी झालेल्या मोठ्या जावेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित प्रकरणाची माहिती पोलिसांकडे करण्यात आली असून पीडिता रवीना कासदे (वय 27) ने सांगितलं की, वडिलोपर्जीत जमिनीवरून हा वाद झाला. शेत कामासाठी तिने देखील पैसे खर्च केले होते. जेव्हा शेती करण्याबाबत सांगितले असता, तिने एक हजार रुपयांची मागणी केली होती.
धाकट्या जावेनं थोरलीच्या कानाचा घेतला चावा
तेव्हा मोठी जाऊबाई आणि धाकट्या भाऊजयीत वाद झाला होता. रवीनाने आरोप केला की, वादादरम्यान ती घरात गेली, त्यानंतर थोरलीनं तिला पकडलं आणि मारहाण केली. त्यानंतर धाकट्या जावेनं थोरलीच्या कानाचा चावा घेतला होता. कुटुंबीयांनी तिला तात्काळपणे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या कानाला गंभीर दुखापत झालेली आहे.
