2 वर्षांच्या बाळासह आईने साडीने गळफास घेतला, आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर

मुंबई तक

Crime News : 2 वर्षांच्या बाळासह आईने साडीने गळफास घेतला, आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर

ADVERTISEMENT

आठ वर्षों से मानसिक स्वास्थ्य संबंधी इलाज करा रही थी. (Photo: Representational)
आठ वर्षों से मानसिक स्वास्थ्य संबंधी इलाज करा रही थी. (Photo: Representational)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

2 वर्षांच्या बाळासह आईने साडीने गळफास घेतला

point

आत्महत्येचं धक्कादायक कारण समोर

Crime News : उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील लार पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या नेमा गावात मंगळवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एका 27 वर्षीय महिलेने स्वतःसोबत दोन वर्षांच्या मुलालाही गळफास लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत महिलेचं नाव चंद्रकला ठाकुर असून ती मुन्ना ठाकुर यांची पत्नी होती.

अधिकची माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळी चंद्रकला आपल्या दोन वर्षांच्या मुलगा कार्तिकसोबत घराच्या खोलीत होती. बराच वेळ झाला तरी ती बाहेर आली नाही म्हणून घरच्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला आणि आत पाहिलं असता सगळेच थक्क झाले — चंद्रकला आणि तिचा लहान मुलगा कार्तिक हे दोघेही साडीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळले. 

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक लोक आणि नातेवाईकांनी पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामा करून दोन्ही मृतदेह उतरवून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले. प्राथमिक तपासात पोलिसांनी या घटनेला आत्महत्या मानले असून, नेमके कारण समजण्यासाठी तपास सुरू आहे.

हेही वाचा : फटाक्यावर ठेवला ग्लास अन् झाला स्फोट, ग्लासाचे तुकडे होऊन घुसल्या तरुणाच्या शरीरात, रुग्णालयातच...

हे वाचलं का?

    follow whatsapp