भरधाव दुचाकीवरून जावयाने सासूवर हेल्मेटने हल्ला केला, महिलेचा रस्त्यावर आदळून दुर्दैवी अंत
Crime News : जावयाने आपल्याच सासूच्या डोक्यावर चालत्या दुचाकीवरून हेल्मेटने हल्ला करत हत्या केली. या प्रकरणाचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून खुलासा झाला. मृत झालेल्या सासूची ओळख अरुणा अशी झाली, या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जावयाने हेल्मेटने हल्ला करत सासूला संपवलं
सीसीटीव्हीत जावयाचं पितळ उघडं पडलं
Crime News : तेलंगानाच्या करिमनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकी, आला आहे. जावयाने आपल्याच सासूच्या डोक्यावर चालत्या दुचाकीवरून हेल्मेटने हल्ला करत हत्या केली. या प्रकरणाचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून खुलासा झाला. मृत झालेल्या सासूची ओळख अरुणा अशी झाली तर आरोपीचे नाव स्नेहित (वय 28) असे आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हे ही वाचा : महाराष्ट्र हादरला, जिल्हा परिषद शिक्षकाचा मर्डर, मैत्रिणीचा अघोरी सल्ला अन् बायकोची सुपारी; कारण काय?
जावयाने हेल्मेटने हल्ला करत सासूला संपवलं
माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी स्नेहित आपली सासू अरुणाला घेऊन दुचाकीवरून चालला होता. याचदरम्यान स्नेहितने गाडी चालवताना आपल्या सासूवर हेल्मेटने हल्ला केला. या हल्ल्यात सासू बाईकवरून खाली पडली, अशातच तिचा जागीच मृत्यू झाला. स्नेहितने प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला आणि तिला रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण स्नेहितने आपल्या कुटुंबाला सांगितलं की, सासूला हृदयविकाराचा झटका आला आणि ती कोसळली.
सीसीटीव्हीत स्नेहितचं पितळ उघडं पडलं
मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता, जावई स्नेहितचं पितळ उघडं पडलं. सीसीटीव्हीत स्नेहित आपल्या सासूवर हेल्मेटने हल्ला करताना दिसतोय. यामुळे स्नेहितने केलेल्या कृत्याने हा अपघात नसून ही सुनियोजित हत्या असल्याचं दिसतंय. खरं प्रकरण समोर आल्यानंतर आरोपीची पत्नी कविताने आपला पत्नी स्नेहित विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा : बीड : 1 नवरी अन् 8 ते 9 नवरदेव?.., भयंकर प्रकार; एवढ्या जणांशी कसं केलं लग्न?
दरम्यान, पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणे असे की, या प्रकरणात प्रत्येक बाजूने तपास केला जाणार आहे. अशा कौटुंबिक संबंधामधील क्रूरतेनं लोकांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे परिसर हादरून गेला आहे.









