नव्या प्रेयसीसोबत ex गर्लफ्रेंडच्या घरी गेला, माफी मागणारच इतक्यात..., जीव गमावला!

मुंबई तक

UP Crime News : जुन्या प्रेयसीची माफी मागण्यासाठी तिच्या घरी गेलेल्या एका तरुणाची आणि त्याच्या मैत्रिणीची हॉकीने बेदम मारहाण करून तिसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून हत्या करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

नव्या प्रेयसीसोबत ex गर्लफ्रेंडच्या घरी गेला

point

माफी मागणारच इतक्यात..., जीव गमावला!

UP Crime News : उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाला आपल्या जुन्या प्रेयसीची माफी मागणे जिवावर बेतले आहे. हा तरुण आपल्या एका नव्या मैत्रिणीसह चौडा गावात राहणाऱ्या आपल्या जुन्या प्रेयसीच्या घरी पोहोचला होता. आपल्या जुन्या चुकांची माफी मागून संबंध सुधारण्याच्या उद्देशाने तो तिथे गेला होता, मात्र तिथे त्याच्यासोबत जे घडले ते पाहून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या वादाचे रूपांतर भीषण हिंसेत झाले आणि त्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला, तर त्याची सोबत असलेली मैत्रीण सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

हेही वाचा : Personal Finance: FD पेक्षा जास्त परतावा! 5 सरकारी योजनांवर तब्बल 8 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज

हॉकीने बेदम मारहाण करून तिसऱ्या मजल्यावरून ढकलले

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हा तरुण आपल्या मैत्रिणीसह जुन्या प्रेयसीच्या घरी पोहोचला, तेव्हा तिच्या पतीला प्रचंड राग आला. आरोपी हितेश राणा आणि त्याची पत्नी चंचल यांनी या दोघांनाही पकडून घरामध्ये कोंडले आणि हॉकी स्टिकने त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण इतकी अमानवीय होती की या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. रात्री 3 वाजेच्या सुमारास हा हिंसाचार इतका टोकाला पोहोचला की, मारहाण करत असतानाच या दोघांनाही घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आले. या भीषण घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची मैत्रीण गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : होणाऱ्या नवऱ्यासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार, पोलिसांनी रगेल आरोपीच्या थेट पायावरच झाडल्या गोळ्या!

 पोलीस कारवाई आणि आरोपी पती-पत्नीला बेड्या; रागाच्या भरात घेतला बदला

या घटनेची माहिती मिळताच नोएडा पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवली आणि मुख्य आरोपी हितेश राणा व त्याची पत्नी चंचल यांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आरोपींनी पोलिसांना सांगितले की, मृत तरुण हा चंचलच्या संपर्कात होता आणि ही गोष्ट पती हितेशला अजिबात मान्य नव्हती. तो तरुण आपल्या मैत्रिणीला घेऊन घरी आल्यावर हितेशचा रागाचा पारा चढला आणि त्याने सूड घेण्याच्या भावनेतून ही अमानवीय कृती केली. पोलिसांनी घटनास्थळावरून काही पुरावे जप्त केले असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

प्रशासनाकडून कडक तपासाचे आदेश; अनैतिक संबंध आणि रागातून घडले हत्याकांड

हे वाचलं का?