जिवलग मित्राच्या बहिणीवर होती वाईट नजर, तरुणाने पाठीत 6 वेळा चाकूने सपासप वार करत संपवलं

मुंबई तक

Crime News : मित्रानेच आपल्या जिवलग मित्राच्या बहिणीवर वाईट नजर ठेवल्याने तरुणाने मित्रावर चाकूने हल्ला करत हत्या केली. पोलीस ठाणे परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्कूटर चालवताना अल्पवयीन मुलाने त्याचाच मित्र अमन (वय 19) याच्यावर हल्ला केला. अमनने स्कूटर थांबवली असताच, आरोपी मित्राने घटनास्थळावरून धाव घेतली. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बातम्या हायलाइट

point

'अमन त्याच्या बहिणीबद्दल अश्लील टिप्पणी करत असल्याने मित्राचा केला खून'

point

मित्रानेच मित्रावर सहा वेळा चाकूने केले वार 

Crime News : मित्रानेच आपल्या जिवलग मित्राच्या बहिणीवर वाईट नजर ठेवल्याने तरुणाने मित्रावर चाकूने हल्ला करत हत्या केली. नवी दिल्लीतील मुखर्जीनगर पोलीस ठाणे परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्कूटर चालवताना अल्पवयीन मुलाने त्याचाच मित्र अमन (वय 19) याच्यावर हल्ला केला. अमनने स्कूटर थांबवली असताच, आरोपी मित्राने घटनास्थळावरून धाव घेतली. 

हे ही वाचा : भाच्याने मामाच्या 14 वर्षांच्या मुलीवर केले लैंगिक अत्याचार, गुप्तांगाला नको तेच... लाज आणणारी घटना

घटनास्थळावरील उपस्थितांनी माहिती देत सांगितलं की, पीडित तरुण रस्त्यावर अर्धा तास व्हिवळत होता. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणाला जहांगीरपुरी येथील बाबू जगजीवन राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. 

'अमन त्याच्या बहिणीबद्दल अश्लील टिप्पणी करत असल्याने मित्राचा केला खून'

पीडित कुटुंबीयांच्या जबाबाच्या आधारे, पोलिसांनी संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या. एका पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आरोपीने दावा केला की, अमन त्याच्या बहिणीबद्दल अश्लील टिप्पणी करत होता, याचमुळे त्याने हा गुन्हा केला. घडलेल्या घटनेनुसार, अमन हा आपल्या कुटुंबासोबत संगम पार्क, अशोक विहार येथे राहत होता.

अमनवर तब्बल सहा वेळा चाकूने वार

अमनचा भाऊ रहमानने सांगितले की, सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमार अमन मित्रासोबत घरातून बाहेर पडला होता. सुमारे अर्ध्या तासानंतर कोणीतरी त्यांना सांगितलं की, त्याच्या भावावर चाकूने हल्ला झाला. रूग्णालयात गेल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक पाहायला मिळाली होती, मात्र नंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मागे बसलेल्या संशयिताने अमनवर तब्बल सहा वेळा चाकूने वार केला. 

हे वाचलं का?