महिलेला ब्लॅकमेल करत लैंगिक संबंध, नको तेच फोटो-व्हिडिओ Viral करण्याची दिली धमकी अन्...

मुंबई तक

Crime News : एका व्यक्तीने महिलेला ब्लॅकमेल करत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. तिने नकरा दिल्यानंतर तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. या घटनेनं परिसर हादरून गेले होते.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण 

point

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

Crime News : बंगळरूमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अशातच एक धक्कादायक प्रकर उघडकीस आले आहे, ज्यात एका व्यक्तीने महिलेला ब्लॅकमेल करत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. तिने नकरा दिल्यानंतर तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. या घटनेनं परिसर हादरून गेले होते. अशातच संबंधित महिलेनं 30 एप्रिल रोजी राजेश्वरी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : बीड : अजोळी गेलेल्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर नराधम आजोबाने केले अत्याचार, गुप्तांगाला...

पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली, अशातच आरोपीची ओळख रामनगर येथील बालकल्याण समितीचा सदस्य हनियार चंद्रगौडा (वय 46) अशी पटली. एफआरआयनुसार, पीडित महिला आणि चंद्रगौडा यांची भेट 2021 मध्ये ओळख झाली होती. ती महिला व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे. आरोपीने आपण टीव्ही मालिकांशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला आणि मेकअपचे काम देण्याच्या बहाण्याने तिचा फोन नंबर मिळवला.  

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण 

पीडित महिला गेल्या आठ वर्षांपासून नवऱ्यापासून विभक्त राहत होती. याचा फायदा घेत चंद्रगुप्तने तो एक प्राध्यापक आहे आणि त्याला चांगला पगार आहे. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण ठेवले. पोलिसांनी सांगितलं की, चंद्रगुप्तने तिला धमकावून तिचे खासगी फोटो आणि व्हिडिओ वापरले. 

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

आरोपीला महिलेनं धमकी दिली की, तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही, तर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेनं दबावाखाली तिने त्याचं बोलणं ऐकून घेतले, पीडितेची फसणूक इथपर्यंत न राहता पुढे गेली. 2024 मध्ये त्याने तिच्या कागदपत्रांचा वापर करत घर घेतले. तिथे त्याने स्वत: पती असल्याची ओळख सांगितली. 

हे वाचलं का?