'बघ..मी माझं गुप्तांग कापून टाकलं..' बायकोसोबतच्या वादानंतर नवऱ्याचं कृत्य, पुढे काय घडलं?
रागाच्या भरात एखादा माणूस काय करेल काही सांगता येत नाही. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातून याच रागाच्या भरात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'बघ..मी माझं गुप्तांग कापून टाकलं..'
बायकोसोबतच्या वादानंतर नवऱ्याचं कृत्य
डॉक्टर काय म्हणतात?
Crime News : रागाच्या भरात एखादा माणूस काय करेल काही सांगता येत नाही. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातून याच रागाच्या भरात घडलेला एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. येथील एका 25 वर्षीय व्यक्तीने बायकोसोबत झालेल्या वादानंतर धक्कादायक पाऊल उचलले. रागाच्या भरात त्याने आपले गुप्तांगच कापून टाकले आणि स्वत:च्या गळ्यावर देखील वार करण्याचा प्रयत्न केला. घरात चाललेला वाद ऐकून शेजारी घरात आले आणि त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले.
तरुणात नपुंसकता येईल
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची प्रकृती गंभीर आहे. प्राथमिक उपचारानंतर तरुणाला ट्रॉमा सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. त्याठिकाणी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. या प्रकरणी रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. मणिराज रंजन यांनी सांगितले की, मंगळवारी या तरुणाने आपले गुप्तांग कापले होते. यामागे काही मानसिक कारणदेखील असू शकते. त्याच्यावर अधिक चांगले उपचार केल्यानंतर तो बरा होईल. मात्र यामुळे आता तरुण नपुंसक होईल. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हे ही वाचा : अकोला : आई-वडील मजूरीला गेले अन् घडलं भयानक, 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार
तरीही पोलिस केस नाही
धक्कादायक गोष्ट ही आहे की, इतकी गंभीर घटना होऊनही कोणतीही पोलीस केस दाखल करण्यात आलेली नाही. मात्र गावात आणि आजूबाजूच्या परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या घटनेमुळे लोक अचंबित झाले असून मानसिक तणावातून काय होऊ शकतं याची चर्चा सध्या सुरु आहे.
हे ही वाचा : एक कुटुंब, तीन आमदार, तीन पक्ष..'या' कुटुंबाला लागला जॅकपॉट
मानसिक तणावासाठी समुपदेशन गरजेचे
कुटुंबातील वाद आणि मानसिक तणावात एखादा माणूस काय करु शकतो याचं उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. तज्ज्ञांच्या मते, मानसिक ताण-तणावाच्या काळात समुपदेशन आणि आधार गरजेचा आहे.









