वजन कमी करण्याच्या नावावर जीममध्ये वेगळाच खेळ, महिलांसोबत जीम चालक काय करायचा?
एका जिममध्ये महिलांना अंमली पदार्थ देऊन त्यांचे शोषण आणि ब्लॅकमेलिंग करण्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वजन कमी करण्याच्या नावावर जीममध्ये वेगळाच खेळ
महिलांसोबत जीम चालक काय करायचा?
Crime News : बरेलीमध्ये एका जिममध्ये महिलांना अंमली पदार्थ देऊन त्यांचे शोषण आणि ब्लॅकमेलिंग करण्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. प्री-वर्कआउट ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिसळून महिलांना बेशुद्ध केले जात असे आणि त्यानंतर व्हिडिओ बनवून दीर्घकाळ ब्लॅकमेल केले जात असे, असा आरोप आहे.
वजन कमी करण्याच्या बहाण्याने..
कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका जिममध्ये महिलांना वजन कमी करण्याचे आणि फिटनेस सुधारण्याचे आमिष दाखवून बोलावले जात असे. सुरुवातीला सगळं काही व्यवस्थित चालू होते; वर्कआउट, डाएट प्लॅन आणि ट्रेनिंग. मात्र, हळूहळू याच विश्वासाचे रूपांतर एका धोकादायक कटात झाले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, जिम चालक अक्रम आणि त्याचा भाऊ आलम महिलांना वेगाने वजन कमी करण्याचे आमिष दाखवत असत. यासाठी त्यांना खास प्री-वर्कआउट ड्रिंक दिले जात असे. मात्र, या ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ मिसळलेले असायचे. ते ड्रिंक प्यायल्यानंतर महिला हळूहळू बेशुद्धावस्थेत जात असे. याच दरम्यान तिला जिममध्ये असलेल्या एका खाजगी खोलीत नेले जात असे. तिथे तिच्यावर बलात्कार केला जात असे आणि संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले जात असे, असा आरोप आहे.
हे ही वाचा : 26 वर्षांचा नजीर गेला कुलरमध्ये पाणी टाकायला, पुढच्या क्षणी गाठलं मृत्यूनं!
50 लाखांची मागणी
आरोपींनी या गुन्ह्याचे रूपांतर एका संघटित ब्लॅकमेलिंग नेटवर्कमध्ये केले होते. व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर पीडितेवर त्याद्वारे दबाव टाकला जात असे. आधी तिला घाबरवले जात असे आणि नंतर पैशांची मागणी केली जात असे. जर महिलेने विरोध केला किंवा पैसे देण्यास नकार दिला, तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली जात असे. इतकेच नाही तर आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला, पतीला आणि मुलाला इजा करण्याची धमकीही दिली होती. सुरुवातीला आरोपींनी महिलेकडून दहा हजार रुपयांची वसुली केली. मात्र, जेव्हा त्यांना जाणवले की भीतीचा परिणाम होत आहे, तेव्हा त्यांनी रकमेची मागणी वाढवून दहा लाख आणि नंतर 50 लाख रुपयांपर्यंत केली. पीडितेवर सतत मानसिक दबाव टाकला जात होता. तिला फोन, मेसेज आणि व्हॉट्सॲपद्वारे धमकावले जात असे. आरोपींनी तिचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह केले होते, जे व्हायरल करण्याची धमकी दिली जात असे.
हे ही वाचा : पवारांच्या NCP ला मोठा धक्का, 'तिने' भाजप मंत्र्याच्या पत्नीला हरवलं पण आता गमावलं 'सगळ्यात मोठं' पद
जिममध्ये खासगी खोली कशासाठी?
सततच्या ब्लॅकमेलिंग आणि भीतीपोटी जगणाऱ्या महिलेने अखेर हिंमत एकवटली आणि ती पोलिसांकडे पोहोचली. तिच्या तक्रारीमुळे या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. तक्रार मिळताच पोलीस सक्रिय झाले आणि तातडीने कारवाई सुरू करण्यात आली. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन पथके तयार केली आणि आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी जिमवर छापा टाकला असता तिथले दृश्य धक्कादायक होते. तिथून अनेक आक्षेपार्ह आणि संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्या. ज्यामध्ये 10 हजार रुपये रोख, 9 शक्तिवर्धक औषधांच्या बाटल्या, 6 इंजेक्शन, 2 मोबाईल फोन आणि व्हिडिओ व फोटो असलेले पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले. याशिवाय जिमच्या आत असलेल्या खाजगी खोलीनेही अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.









