प्रेयसीचा गोड बोलून 'तो' सल्ला, प्रियकराने गुंगीचे औषध आणले, अन् पोराबाळांसह बायकोला...
Crime News : स्वतःच्या पत्नी आणि दोन मुलांची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली असून, प्रेयसीच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
प्रेयसीचा गोड बोलून 'तो' सल्ला
प्रियकराने गुंगीचे औषध आणले
अन् पोराबाळांसह बायकोला...
Crime News : बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कांटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मधुबन जगदीश गावात घडलेल्या खळबळजनक तिहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणातील सत्य कोणत्याही फिल्मी पटकथेपेक्षा भयानक आहे. स्वतःचा संसार आणि पोटची मुले ज्याच्यावर अवलंबून होती, तो संतोष साह नावाचा पिताच आपल्या पत्नीचा आणि दोन निरागस मुलांचा मारेकरी निघाला आहे. पोलीस तपासात असे समोर आले आहे की, आरोपी संतोषचे 2014 पासून करीना कुमारी नावाच्या विवाहित महिलेशी अनैतिक संबंध होते. करीनालाही स्वतःची मुले आहेत, मात्र संतोषला तिच्यासोबत नवीन आयुष्य सुरू करायचे होते. या नवीन आयुष्याच्या मार्गात त्याची पत्नी आणि मुले अडथळा ठरत असल्याने, प्रेयसीच्या सततच्या दबावाखाली येऊन संतोषने स्वतःच्याच कुटुंबाला संपवण्याचा क्रूर निर्णय घेतला.
गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; जमीनीच्या वादाचा बनाव फसला
हत्याकांडाला अंमलात आणण्यासाठी संतोषने 28 एप्रिलच्या रात्री एक नियोजनबद्ध कट रचला होता. त्याने सर्वप्रथम आपल्या पत्नीला जेवणातून गुंगीचे औषध दिले आणि ती बेशुद्ध झाल्यानंतर दोरीने तिचा गला आवळून तिची हत्या केली. क्रूरतेची सीमा ओलांडत त्याने आपल्याच दोन निष्पाप मुलांचे तोंड दाबून त्यांना मृत्यूच्या दरीत लोटले. या कृत्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी त्याने या घटनेला जमिनीच्या वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दिशाभूल व्हावी म्हणून त्याने आपल्याच नातेवाईकांविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला होता, जेणेकरून संशयाची सुई त्याच्यावरून बाजूला होईल. मात्र, पोलिसांनी तांत्रिक बाबींची तपासणी सुरू करताच त्याच्या खोटेपणाचे एकेक पदर उलगडत गेले.
सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांनी उघडले बिंग; प्रेयसीसह आरोपीला अटक









