समजून घ्या: महिला मुख्यमंत्री तरीही बंगालच्या महिलांनीच का फिरवली ममता दीदींकडे पाठ?

अनुजा धाक्रस

प. बंगाल विधानसभा निवडणुकीत महिला मतदारांनी ममता दीदींच्या टीएमसी पक्षाला मतदान करता भाजपला भरभरून मतदान केलं. पण हे नेमकं कशामुळे झालं हे आपण समजून घेऊया.

ADVERTISEMENT

samjun ghya anuja dhakras despite having a female chief minister why did women of bengal turn their backs on mamata didi
समजून घ्या
google news

कोलकाता: महिला मतदार ही सत्तेची चावी झाली आहे, असं समीकरण गेल्या काही वर्षांमधल्या निवडणुकांमध्ये झाल्याचं दिसलं. भाजपचा महिला मतदारांवर वाढलेला जोर, निवडणुकांमध्ये महिलांचे मुद्दे केंद्रस्थानी येणं ते निवडणुकांच्या तोंडावर महिलांसाठी योजना आणणं यामुळे पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या निकालामध्ये महिला फॅक्टर सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जींसारखं खमकं महिला नेतृत्व आणि मुख्यमंत्री, लढवय्या महिला खासदारांची फौज, आणि महिलांना महिन्याला 1000 रूपये अशा योजना असूनही महिला ममता बॅनर्जींच्या पाठिशी का नाही राहिल्या हे आपण समजून घेऊया. 

लोकनीती-CSDS चा सर्व्हे सांगतो 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला महिलांची 50 टक्के मतं मिळालेली मग आताच माशी कुठे शिंकली? 

1. महिला मुख्यमंत्री असूनही महिला असुरक्षित 

पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्व, SIR सोबतच महिला कार्ड निवडणुकीत होतं. RG कारमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणामुळे महिला असुरक्षित असल्याचा प्रचार झाला. इतकंच नाही तर महिलांनी सातच्या आत घरात हा बुरसटलेला विचार खुद्द महिला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनीच बोलून दाखवल्याने महिला कितपट पाठिशी राहतील ह्यात शंकाच होती. यापलीकडे उत्तर 24 परगणामधल्या संदेशखाली भागात तृणमूल काँग्रेसचा शहाजहान शेखने टीएमसीच्या कार्यालयात महिलांचं शोषण केल्याचे आरोप झाले. त्यामुळे खात्यात कितीही पैसे टाका, पण महिलांची सुरक्षाच धोक्यात असल्याची भावना तयार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा>>  समजून घ्या: निवडणूक आयोगाचा थेट पहारा! ऐन निवडणुकीत कोणते नवे नियम?

2. लाडक्या बहिणीसारख्या योजना फेल 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेने महायुतीला जिंकवून दिलं म्हणतात, पण बंगालमध्ये लक्ष्मी भांडार योजना 2021 पासूनच सुरू होती. निवडणुकीच्या तोंडावर महिला असुरक्षिततेचा मुद्दा तापल्याने योजनांचा असर फारसा राहिला नाही, शिवाय तृणमूलला डावलून भाजपला निवडून दिलं, तरी दर महिन्याला पैसे खात्यात येणारच आहेत, यानेही महिला निश्चिंत असाव्यात, कारण भाजपनेही अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 3000 रूपये देण्याचं आश्वासन दिलं, जे ममता देत आहेत त्यापेक्षा दुप्पट होतं. 

हे वाचलं का?