पुणे : सुट्टीला आलेल्या नातीवर आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न, संतप्त जमावाने दिला चोप
एका सात वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच 50 वर्षीय सख्ख्या आजोबाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पुण्यातील नसरापूर प्रकरणाची पुनरावृत्तीची थोडक्यात टळली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पुणे : सुट्टीला आलेल्या नातीवर आजोबाचा अत्याचाराचा प्रयत्न
संतप्त जमावाने दिला चोप
Pune Crime : पुण्यातील पर्वती भागातील जनता वसाहत परिसरात एका सात वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच 50 वर्षीय सख्ख्या आजोबाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पुण्यातील नसरापूर प्रकरणाची पुनरावृत्तीची थोडक्यात टळली आहे. पीडित मुलगी घरात एकटी असताना तिच्या आईच्या वडिलांनी, म्हणजेच सख्ख्या आजोबांनी तिचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या चिमुरडीने प्रसंगावधान राखून आरडाओरडा केल्यामुळे या कृत्याचा उलगडा झाला. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मुलगी आजोबांकडे आली होती.
आरोपीला दिला चोप
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन वर्षांपूर्वीच जनता वसाहतीत भाड्याने घर घेतले होते. दारुच्या नशेत असताना त्याने हे कृत्य केले. एका महिलेने घराच्या पत्र्यातून डोकावून पाहिले असता तिला हा आतील भयानक दृ्श्य दिसले. यावेळी आरोपीने नातील माळ्यावर लपूवन ठेवले. यांनतर त्या महिलेने आरडाओरड करुन लोकांना जमा केले. ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक तात्काळ घराबाहेर जमा झाले. नागरिकांना दरवाजा तोडून घरातून आत प्रवेश केला आणि मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली. पीडितेने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर संतप्त जमावाने नराधम आरोपीला चोप दिला.
हे ही वाचा : पवारांच्या NCP ला मोठा धक्का, 'तिने' भाजप मंत्र्याच्या पत्नीला हरवलं पण आता गमावलं 'सगळ्यात मोठं' पद
ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी
घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. संतप्त जमाव इतका आक्रमक होता की, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पुणे पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी आणि मोठा फौजफाटा पर्वती परिसरात दाखल झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पीडित मुलीला वैद्यकीय चाचणीसाठी तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : समजून घ्या: महिला मुख्यमंत्री तरीही बंगालच्या महिलांनीच का फिरवली ममता दीदींकडे पाठ?
संतप्त नागरिकांचा मोर्चा
या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ पर्वतीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर एकत्र येत मोर्चा काढला. जमाव पांगवण्यासाठी पुणे पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी पर्वतीत दाखल झाले होते. पीडित मुलीच्या आईने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.









