कोकण विभागासह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, तर काही जिल्ह्यांना पावसाचं सावट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यावर हळुहळु दुहेरी संकट ओढावलं आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा वाहण्याची शक्यता आहे, तर काही जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपून काढण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्याच्या वातावरणात बदल

point

'या' जिल्ह्यांत ऊन तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचं सावट

Maharashtra Weather : राज्याच्या वातावरणात आता बदल होऊ लागला आहे. राज्यावर हळुहळु दुहेरी संकट ओढावलं आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटा वाहण्याची शक्यता आहे. मराठवाडासह इतर काही भागांमध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे, जाणून घ्या पुढील एकूण अंदाज... 

हे ही वाचा : शाळेच्या मार्कशीटवर खाडाखोड; बापाने 9 वर्षाच्या चिमुरडीचा मशिनने चिरला गळा

कोकण विभागात उष्णतेची लाट 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील कोकण भागात उकाडा देखील जाणवण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत सायंकाळी काही भागांतच हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांत देखील विजांसह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

'या' अवकाळी जिल्ह्यांत पावसाचं सावट 

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. काही विभागांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे.  

हे ही वाचा : पवारांच्या NCP ला मोठा धक्का, 'तिने' भाजप मंत्र्याच्या पत्नीला हरवलं पण आता गमावलं 'सगळ्यात मोठं' पद

विदर्भासह मराठवाड्यात स्थिती काय? 

मराठवाडा विभागातील बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात हवामान हे उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे. नागपूर, अकोला, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये उष्णतेच्या लाटा वाहणार आहेत. 

हे वाचलं का?