नागपूर : दोघांचा एकाच मुलीवर जीव, भेटायला बोलावले अन्... प्रेमसंबंधाच्या वादातून एकाने दुसऱ्या तरुणाचा केला गेम

योगेश पांडे

Nagpur crime : दोन तरुण एकाच तरुणीवर प्रेम करत होते, यापैकी एका तरुणाने या प्रेमप्रसंगातून दुसऱ्या तरुणाला संपवलं. हत्या केलेल्या तरुणाचे नाव जोहान शेख (वय 17) अशी त्याची ओळख समोर आली. तसेच ज्याने खून केला त्या तरुणाचे नाव अनुराग असे आहे. हे प्रकरण नागपूर शहरातील कलमना पोलीस ठाणे परिसरातील वाडपेईनगर येथील आहे.

ADVERTISEMENT

Nagpur crime
Nagpur crime
google news

बातम्या हायलाइट

point

जोहानला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून हत्या केली 

point

अल्पवयीन आरोपीविरोधात हत्या प्रकरणात तक्रार दाखल

Nagpur Crime : दोन तरुण एकाच तरुणीवर प्रेम करत होते, यापैकी एका तरुणाने या प्रेमप्रसंगातून दुसऱ्या तरुणाला संपवलं. हत्या केलेल्या तरुणाचे नाव जोहान शेख (वय 17) अशी त्याची ओळख समोर आली. तसेच ज्याने खून केला त्या तरुणाचे नाव अनुराग असे आहे. हे प्रकरण नागपूर शहरातील कलमना पोलीस ठाणे परिसरातील वाडपेईनगर येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला असून आरोपीने कांड करून घटनास्थळावरून पळ काढला आहे. 

हे ही वाचा : जालना : 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्नावस्थेत फोटो काढून वर्षानुवर्षे अत्याचार, व्हिडिओ कॉल करून नको तेच..

जोहानला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून हत्या केली 

दरम्यान, मृत जोहान शेख आणि आरोपी अनुराग या दोघांचा एकाच तरुणीवर जीव जडला होता. तरुणीने काही दिवसांपूर्वी जोहान शेखशी ब्रेक-अप केला होता, नंतर तिचे आरोपी अनुरागशी प्रेमसंबंध सुरू झाले होते. अशातच जोहानने तरुणीला आरोपी अनुरागशी ब्रेक अप करण्यास दबाव आणू लागला होता, नंतर शिवीगाळ देखील केली. तरुणीने आरोपी अनुरागला जौहानबाबत सांगितले. नंतर अनुरागला राग अनावर झाला आणि जोहानला भेटण्यास बोलावून त्याची हत्या केली. 

अल्पवयीन आरोपीविरोधात हत्या प्रकरणात तक्रार दाखल

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी अल्पवयीन आरोपीविरोधात हत्या प्रकरणात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात आरोपीचा तपास सुरू आहे. या हत्या प्रकरणात कलमना पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी सांगितलं की, मृत तरुण आणि आरोपी एका-दुसऱ्यांना चांगले ओळखत होते. 

हे ही वाचा : अकोला : आई-वडील मजूरीला गेले अन् घडलं भयानक, 60 वर्षीय शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

प्रेमप्रकरणातून जोहानची अनुरागने हत्या केली. आरोपीने इंस्टाग्रामवर जोहान शेखला फोन करून त्याला बोलावले. नंतर जोहान घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपीने चाकूने सपावप वार करत जोहानचा खून करण्यात आला. 

हे वाचलं का?