जालना : 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्नावस्थेत फोटो काढून वर्षानुवर्षे अत्याचार, व्हिडिओ कॉल करून नको तेच..

मुंबई तक

Jalna Crime : जालना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीने अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्षे ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील 25 वर्षीय पीडितेने पारध पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. 

ADVERTISEMENT

Jalna Crime
Jalna Crime
google news

बातम्या हायलाइट

point

2016 पासून पीडितेचे अश्लील फोटो काढून अनेक वर्षे ब्लॅकमेल 

point

मकी देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप

Jalna Crime : गौरव साळी - जालना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीने अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्षे ब्लॅकमेल केलं आणि तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील 25 वर्षीय पीडितेने पारध पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. 

हे ही वाचा : एक कुटुंब, तीन आमदार, तीन पक्ष..'या' कुटुंबाला लागला जॅकपॉट

2016 पासून पीडितेचे अश्लील फोटो काढून अनेक वर्षे ब्लॅकमेल 

पारध पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, शेख इम्रान शेख हबीब पिंजारी (वय 37) या विवाहित इसमाने 2016 पासून तिचे अश्लील फोटो काढून तिला अनेक वर्षे ब्लॅकमेल केले. तक्रारीनुसार, पीडित तरुणी अल्पवयात असताना घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तिचा अर्धनग्नावस्थेत तिचा फोटो काढला होता. नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. 

मकी देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप

दरम्यान, आरोपी 2017 पासून संभाजीनगर येथे जाऊन तिला धमकी देऊन शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडण्यात आले आणि नंतर तक्रार दाखल केल्याचा आरोप करण्यात आला. एवढंच नाही,तर नराधम आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद केले होते. 

2018 मध्ये आरोपीच्या कुटुंबीयांनीही पीडितेला धर्मांतर करण्यासाठी दबाव

दरम्यान, आरोपीने पीडितेला त्याच्या धर्माचे कुराण पठण करण्यास भाग पाडले. तसेच नमाज कशी अदा करायची हे देखील शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच तिला उर्दू आणि मराठी भाषेतील कुराण देण्यात आल्याचे सांगण्यात आले, असे त्या पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. 2018 मध्ये आरोपीच्या कुटुंबीयांनीही पीडितेला धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकल्याचा पीडितेचा आरोप आहे.  

हे वाचलं का?