बापरे... महाराष्ट्रात 2019 ला जे घडलं तेच आता तामिळनाडूत, थलपती विजय हाता-तोंडाशी आलेला घास गमावणार?

मुंबई तक

तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. विजय यांना रोखण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

speculation surrounds dmk aiadmk alliance in tamil nadu will arch rivals join forces to stop vijay vidhansabha election
डीएमके आणि एआयएडीएमके यांच्या युतीची चर्चा
google news

चेन्नई: तामिळनाडूमधून एक अत्यंत मोठी आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाला धक्का देणारी बातमी समोर येत आहे. सध्या तामिळनाडूमध्ये नवं सरकार स्थापन करणं हा अत्यंत विषय चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान, अशातच आता जे 2019 मध्ये महाराष्ट्रात घडलं तसंच काहीसं घडण्याच्या उंबराठ्यापर्यंत तामिळनाडूतील राजकारण पोहोचलं आहे. कारण आतापर्यंत कधीही जे घडलं नाही ते आता तिथे घडत असल्याचं पाहायला मिळतंय. तामिळनाडूतील जनतेने थलपती विजय यांच्या पक्षाला 108 जागा दिलेल्या असल्या तरी त्यांच्याकडे बहुमत मात्र नाही. अशावेळी डीएमके (DMK) आणि एआयएडीएमके (AIDMK) यांसारख्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्येच सत्तेसाठी आणि थलपती विजय यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युती होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

महाराष्ट्रसारखीच नवी आघाडी तामिळनाडूत?

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना (तेव्हाची अखंड) यांना बहुमताचा कौल मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आणि शिवसेनेने भाजपची साथ सोडत थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांना सोबत घेत आपलं स्वत:चं सरकार स्थापन केलं होतं. एकीकडे 105 जागांसह भाजप हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, शिवसेनेसह दोन्ही विरोधी पक्षांनी एकत्र येत भाजपला राज्यात सत्तेपासून तब्बल अडीच वर्ष दूर ठेवलं होतं.

हे ही वाचा>> 'ते' एक स्वप्न अन् 'या बड्या नेत्यांचा' राजकारणात गेम ओव्हर! असं नेमकं काय घडलं?

आता असाच काहीसा प्रकार तामिळनाडूमध्ये पाहायला मिळतोय का? अशी जोरदार चर्चा तामिळनाडूमध्ये सुरू झाली आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार स्थापन करण्यासाठी डीएमके आणि एआयडीएमके या दोन्ही पक्षात बंद दाराआड जोरदार चर्चांची सत्रं सुरू आहेत. राजकारणात नवख्या असलेल्या विजय यांच्या पक्षाने दोन्ही जुन्या पक्षांना निवडणुकीत जबदरस्त दणका दिला. मात्र, असं असलं तरी बहुमताचा आकडा ही गोष्ट विजय यांच्यासाठी अद्याप तरी अडचणीची गोष्ट होऊन बसली आहे. यामुळे आता टीव्हीकेला रोखण्यासाठी दोन जुन्याजाणत्या पक्षांनी एका नव्या राजकारणाची सुरूवात करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात दिसते आहे. 

तामिळनाडूत राजकारणाला नवं वळण 

दरम्यान, यापूर्वी टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी लोक भवनात राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. विजय यांनी 112 आमदारांची पाठिंब्याचं पत्रं देखील सादर केलं होतं. मात्र, राज्यपालांनी 118 आमदारांच्या पाठिंब्याच्या पत्राची मागणी केल्याने विजय यांना अधिक वेळ मागून घेतला.

हे वाचलं का?