Maharashtra Weather : राज्यात 15 जिल्ह्यांचं काही खरं नाही, कुठे ऊन तर कुठे अवकाळी संकट

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागानुसार, कोकणात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Maharashtra Weather
Maharashtra Weather
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यातील हवामानात सातत्याने बदल

point

कुठे ऊन तर कुठे पाऊस

point

एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे...

Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभागानुसार, कोकणात उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 5 जिल्ह्यांना उष्णतेचा आणि 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला, अशातच 7 मे रोजी राज्यातील एकूण हवामानाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

हे ही वाचा : शाळेच्या मार्कशीटवर खाडाखोड; बापाने 9 वर्षाच्या चिमुरडीचा मशिनने चिरला गळा

कोकण 

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या विभागांत उकाडा आणखी वाढणार असून दुपारच्या वेळेत उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता अधिक राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यांत सायंकाळी काही भागांतच हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच जिल्ह्यात काही ठिकाणी ठिकठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचं सावट असेल. कोकण किनारी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट कायम राहील अशी शक्यता आहे. याच विभागांमध्ये काही ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच सोलापूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता कायम राहील असा अंदाज बांधण्यात येतो. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून उकाड्यात वाढ होईल. 

हे वाचलं का?