तब्बल 22 तास मृत बाळ होतं आईच्या पोटात, अन् डॉक्टरांना हवे होते पैसे... चीड आणणारी घटना

मुंबई तक

गरोदर मातेच्या पोटात तब्बल 22 तास मृत भ्रूण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. आता याच प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

beed shocking incident in parli gross negligence in treatment fetus dies dead embryo retained in womb for a staggering 22 hours mothers life endangered complaint against doctors
प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok
google news

योगेश काशिद, बीड: परळी शहरातील एका खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या उपचारातील  हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर या हृदयद्रावक घटनेनंतरही गांभीर्य लक्षात न घेता केवळ आर्थिक लाभ उठविण्याच्या उद्देशाने या गरोदर मातेच्या पोटात तब्बल 22 तास मृत भ्रूण ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

डॉक्टरच्या हलगर्जीनेपणामुळे बाळ तर दगावलेच पण त्यानंतर या बाळाच्या मातेची प्रचंड हेळसांड करुन तिच्याही जीवाशी खेळ केल्याचा अमानवी व वैद्यकीय क्षेत्राला डाग लावणारा गंभीर लज्जास्पद प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित डॉक्टरांविरोधात शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कर्तव्यात कसूर, बाळाच्या मरणास कारणीभूत व मातेच्या जीवाशी खेळण्याच्या अघोरी प्रकाराची सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय?

या हृदय पिळवटून टाकणाऱ्या व धक्कादायक प्रकारानंतर वैजनाथ संभाजी मुंडे यांनी पोलिसांत धाव घेऊन गित्ते हॉस्पिटलच्या डॉ. कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या पत्नीवर गेल्या काही महिन्यांपासून संबंधित डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. 23 एप्रिल रोजी अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला.

हे ही वाचा>> 'बघ..मी माझं गुप्तांग कापून टाकलं..' बायकोसोबतच्या वादानंतर नवऱ्याचं कृत्य, पुढे काय घडलं?

डॉक्टरांनी तातडीने दवाखान्यात येण्यास सांगितले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतरही योग्य वेळी तपासणी व उपचार करण्यात आले नाहीत. तसेच, सोनोग्राफीसाठी बाहेरील केंद्रावर पाठविण्यात आले. तेथे झालेल्या तपासणीनंतर गर्भातील बाळाची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. तरीही रुग्णालयात वेळेत आवश्यक वैद्यकीय निर्णय न घेता विलंब करण्यात आला. दरम्यान, उपचाराच्या नावाखाली वारंवार पैसे मागण्यात आले. तसेच प्रचंड अर्थिक शोषण करण्यात आले. असा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

हे वाचलं का?