विवस्त्र अवस्थेत धावल्यास 5 हजार रुपये, गावकऱ्यांची तरुणाशी अजब पैज, तरुण नग्न अवस्थेत गावभर लागला धावू...

मुंबई तक

Crime news : तरुणाने 5 हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली. मित्रांनी तो तरुण गावातून नग्न अवस्थेत धावत असल्याचा व्हिडिओ चित्रित करून शेअर केला.  नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत कठोर भूमिका घेत चौघांवर कठोर कारवाई केली. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

गावकऱ्यांनी तरुणाशी लावली अजबच पैज

point

तरुण रस्त्यावरून नग्न अवस्थेत लागला धावू

Crime news : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील चंदपा गावात एका तरुणाने 5 हजार रुपयांची पैज जिंकण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावण्यात आली. मित्रांनी तो तरुण गावातून नग्न अवस्थेत धावत असल्याचा व्हिडिओ चित्रित करून शेअर केला.  नंतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत कठोर भूमिका घेत चौघांवर कठोर कारवाई केली. 

हे ही वाचा : जालना : 25 वर्षीय तरुणीचा अर्धनग्नावस्थेत फोटो काढून वर्षानुवर्षे अत्याचार, व्हिडिओ कॉल करून नको तेच..

गावकऱ्यांनी तरुणाशी लावली अजबच पैज

संबंधित प्रकरणात काही गावकऱ्यांनी त्या तरुणाशी पैज लावली की, जर तू नग्न अवस्थेत धावला तर 5 हजार रुपयांचे बक्षिण देण्यात येईल. व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाच ते आठ तरुण त्याला कपडे काढण्याबाबत सतत आग्रह धरत आहेत. व्हिडिओत तरुण रस्त्यावरून बनियन आणि अंतर्वस्त्र सोडून नग्न अवस्थेत धावू लागला. 

तरुण रस्त्यावरून नग्न अवस्थेत लागला धावू

त्या तरूणाच्या या कृत्यामुळे गावकरी संतप्त झाले, तो रस्त्यावरून नग्न अवस्थेत धावताना स्त्रिया आणि वृद्ध लोक त्याच्या बाजूने जात होते. हे लज्जास्पद कृत्य घडताना त्याच्या मित्रांनी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण केले. नंतर पोलिसांनी नग्न अवस्थेत धावणाऱ्या तरुणाला आणि त्याचा चिथावणी देणाऱ्या तिघांना अटक केली. 

हे ही वाचा : नागपूर : दोघांचा एकाच मुलीवर जीव, भेटायला बोलावले अन्... प्रेमसंबंधाच्या वादातून एकाने दुसऱ्या तरुणाचा केला गेम

अटक करण्यात आलेल्यांची ओळख दीपक उर्फ अमर कुमार, देवकुमार उर्फ राज, कृष्ण गोपाल आणि कलुआ उर्फ सुरजीत अशी असून ते सर्व एकाच गावातील रहिवासी आहेत. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारची लज्जास्पद कृत्य करून समाजात अशा घटना घडू लागल्याने समाजाला एक वेगळा संदेश जातो, त्याला सोडण्यात येणार नाही असा पोलिसांनी इशारा दिला.  
 

हे वाचलं का?