नव्या नवरीचा चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू, हत्या की आणखी काही?
Crime News : एका महिलेचा तिच्या घराच्या चौथ्या मजल्यावरून पडून संशयास्पद दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. महिलेच्या आई-वडिलांचा या प्रकरणी असा आरोप होता की, नवरा राजू आणि दोन दीरांनी मिळून तिला घराच्या छतावरून ढकलले आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नवरा आणि दीर पीडितेचा छळ करत मारहाण करायचा
घराच्या छतावरून विणा कोसळली, दीराचा फोन
Crime News : राजधानी दिल्लीतील इंद्रापुरी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका महिलेचा तिच्या घराच्या चौथ्या मजल्यावरून पडून संशयास्पद दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. महिलेच्या आई-वडिलांचा या प्रकरणी असा आरोप होता की, नवरा राजू आणि दोन दीरांनी मिळून तिला घराच्या छतावरून ढकलले आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : अनैतिक प्रेमसंबंधाचा संशय, नवऱ्याने बायकोचा कोयत्याने गळा चिरला, रात्रभर मृतदेहाशेजारी..
नवरा आणि दीर पीडितेचा छळ करत मारहाण करायचा
घडलेल्या घटनेत, मृत महिलेची ओळख वीणा अशी असून, तिच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार तिचे लग्न सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी झाले होते. तेव्हापासून तिच्या सासरच्या मंडळींनी तिला अनेक मागण्या करण्यास सुरूवात केली होती. यामुळे तिला प्रचंड त्रास होऊ लागला होता. कुटुंबीयांच्या म्हणण्यांनुसार, तिचा नवरा आणि दीर तिचा छळ करत तिला बेदम मारहाण करायचा. वीणा हे सर्व मोठ्या बहिणीला सांगत होती. मात्र, तिने कोणतीही पोलीस कारवाई केली नव्हती.
घराच्या छतावरून विणा कोसळली, दीराचा फोन
मात्र, मंगळवारी रात्री वीणाच्या मोठ्या बहिणीला अचानकपणे फोन आला होता. वीणा मोठ्याने हंबरडा फोडू लागली होती. ती पुन्हा कधीच काहीही बोलली नाही. तिने आपल्या बहिणीला तिच्या सहा महिन्यांच्या मुलाला उचलून घ्यायला सांगितलं, नंतर फोन कट केला. वीणाचे कुटुंब हे इंद्रापुरीकडे निघाले होते, इतक्यात वीणाच्या दीराने फोन करून सांगितलं की, वीणा छतावरून खाली कोसळली होती.
हे ही वाचा : पैसे देण्यास नकार, डोक्यात तिडीक उसळताच MBBS विद्यार्थ्याची हत्या
याच प्रकरणी एसडीएस याचा तपास करत असून वाणीची हत्या झाली की, त्यामागील वेगळं कारण होते हे उद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र, या घटनेनं वीणाचे आई-वडील दोघे अगदी दु:खी होते. त्यांच्या मते त्यांच्या मुलीचा अशा लोकांमुळेच जीव गेला आहे.









