Daya Nayak पुन्हा मुंबई पोलीस दलात… हॉटेल कामगार ते एन्काउंटर स्पेशालिस्ट, असा झाला प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Encounter specialist Daya Nayak transferred from Maharashtra ATS to Mumbai Police
Encounter specialist Daya Nayak transferred from Maharashtra ATS to Mumbai Police
social share
google news

Encounter specialist Daya Nayak :

महाराष्ट्राचे ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ दया नायक (Encounter specialist Daya Nayak) यांची दहशतवाद विरोधी पथकातून (ATS) पुन्हा मुंबई पोलिसात (Mumbai Police) बदली करण्यात आली. नायक यांच्याशिवाय अन्य सात निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेशही अतिरिक्त महासंचालक (आस्थापना) यांनी जारी केले. यात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ आणि दौलत साळवे यांनाही एटीएसकडून मुंबई पोलिसांकडे पाठवण्यात आले आहे. (Encounter specialist Daya Nayak transferred from Maharashtra ATS to Mumbai Police)

दया नायक यांची मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात चर्चा झाली होती. एटीएसमध्ये असताना नायक यांनी 2021 मध्ये मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा तपास केला होता. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घरातील अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार सापडल्याच हे प्रकरण होतं. मात्र नंतर या प्रकरणाने वेगवेगळी वळणं घेतली होती. दया नायक यांच्यावर या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप होता. त्यातून त्यांची बदली एटीएसमधून गोंदिया येथे करण्यात आली होती. मात्र, बदलीच्या या आदेशाला नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले होते. मॅटने या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यानंतर दया नायक एटीएसमध्ये कार्यरत होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कोण आहेत दया नायक? (Who is Daya Nayak)

दया नायक यांना ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळखलं जातं. 1995 च्या बॅचच्या नायक यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड कारवाया शिखरावर असताना ही म्हणून ओळख मिळवली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 80 हून अधिक एन्काउंटरचा केल्याचा दावा आहे.

दया नायक मुळचे कर्नाटकातील आहेत. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्याने त्यांनी सातवीपर्यंत शाळा शिकल्यानंतर ते 1979 ला मुंबईला आले. येथे दया एका हॉटेलमध्ये काम करत होते. हॉटेलचा मालक दयाला पगार देत असे. त्यांनीच दयाला पदवीपर्यंत शिकवले. त्यानंतर पोलिसात नोकरी लागण्याच्या आधी आठ वर्षांपर्यंत दया नायक यांची ही नोकरी सुरू होती.

ADVERTISEMENT

हॉटेलच्या मालकानेच दया नायक यांना पदवीपर्यंत शिकवले. त्यानंतर 1995 मध्ये दया नायक यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गु्न्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले होते. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काउंटर पथकात होते. दया नायक यांनी 1996 मध्ये पहिला एन्काउंटर केला होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी जवळपास 80 एन्काउंटर केले आहे.

ADVERTISEMENT

शाळा उघडण्याच्या वादात, दया नायक यांनी 2000 साली त्यांच्या गावी एक शाळा उघडली होती. या शाळेचे उद्घाटन अमिताभ बच्चन यांनी केले होते. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनीही यासाठी मदत केल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र शाळा उघडल्यानंतर दाऊद आणि छोटा राजनच्या मदतीने ही शाळा उघडण्यात आल्याचा आरोप दया नायक यांच्यावर करण्यात आला होता. यात त्यांची चौकशी करण्यात आली मात्र ते निर्दोष आढळून आले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT