Crime : 22 दिवसांनी होते तरुणीचे लग्न, मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली अन्…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

The dead body of the girl was found on Sunday in a hotel located in Dasna area of Ghaziabad.
The dead body of the girl was found on Sunday in a hotel located in Dasna area of Ghaziabad.
social share
google news

Crime news In Marathi : लग्न ठरलं. शॉपिंगसाठी ती गाझियाबादला आली. तिथे मित्रासोबत तिने लग्नाची खरेदी केली. रात्री 11 वाजता ती मित्रासोबत हॉटेलवर पोहोचली. दोघे हॉटेलमध्ये थांबले, पण नंतर जे घडलं त्यामुळे सगळेच हादरून गेले. हॉटेलच्या रुम नंबर 209 मध्ये 23 वर्षीय तरुणीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला.

ADVERTISEMENT

गाझियाबादच्या डासना भागात असलेल्या एका हॉटेलमध्ये रविवारी तरुणीचा मृतदेह आढळून आला. ही तरुणी दोन दिवसांपूर्वी हापूरहून लग्नाच्या खरेदीसाठी आली होती आणि तिच्या मित्रासोबत हॉटेलमध्ये थांबली होती. मृत तरुणीच्या तोंडातून फेस आलेला होता असे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

नोव्हेंबर महिन्यात होते लग्न

23 वर्षीय तरुणीचं नाव शहजादी असं आहे. ती धौलाना हापूड येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहजादी पुढील महिन्यात नोव्हेंबरमध्ये दिल्लीत राहणाऱ्या तरुणाशी लग्न करणार होती. गेल्या शुक्रवारी ही तरुणी तिचा एक मित्र अजरुद्दीनसोबत लग्नाची खरेदी करण्यासाठी घरून आली होती. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ती तिच्या मित्र अझरुद्दीनसोबत राहण्यासाठी डासना येथील अनंत हॉटेलमध्ये पोहोचली.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘ती’ जाहिरात शिंदे सरकारच्या अंगलट, 24 तासांत डॅमेज कंट्रोल?

हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना 209 क्रमांकाची खोली दिली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच खोलीत तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. तरुणीसोबत हॉटेलमध्ये राहणाऱ्या अझरुद्दीन या मित्राने शहजादीचा भाऊ दानिश याला फोन करून यासंदर्भात माहिती दिली होती.

तरुणीच्या कुटुंबीयांचा अझरद्दीनवर संशय

माहिती मिळताच स्थानिक वेव्हसिटी पोलीस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि हॉटेलच्या खोलीत पडलेला मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृताचा भाऊ दानिश याने त्याची बहीण शहजादी हिच्या मृत्यू झालेला नाही, अझरुद्दीनने तिची हत्या केली, असा आरोप केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ind vs NZ : शमीने रचला इतिहास, कोहलीचा दिग्गजांना धक्का, सामन्यात 11 मोठे विक्रम

दुसरीकडे, शनिवारी रात्री हॉटेलची रूमची चावी देऊन अजरुद्दीन फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. शहजादीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली. अझरुद्दीन आणि मृत तरुणीमध्ये हॉटेलच्या खोलीत काय झाले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT