Nargis Delhi : भयंकर! मावशीच्या मुलीचा रॉडने गार्डनमध्येच पाडला मुडदा; कारण…

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

That's why Nargis's family refused this marriage. At present, Irfan used to work in food delivery. Which was not liked by the family members of Nargis.
That's why Nargis's family refused this marriage. At present, Irfan used to work in food delivery. Which was not liked by the family members of Nargis.
social share
google news

Delhi murder case : दिल्लीतील मालवीय नगरमध्ये 25 वर्षीय नर्गिसची भरदिवसा लोखंडी रॉडने मारून मारून हत्या करण्यात आली. गॉर्डनमध्ये तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीची झाडाझडती घेतली आणि जे दिसले, ते बघून पोलिसांच्याही पायाखालीच जमीन सरकरली. पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक करण्यात केली. (Nargis, 25, was beaten to death with an iron rod in broad daylight in Delhi’s Malviya Nagar.)

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोपी आणि मयत मुलगी हे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. इरफान आणि नर्गिसच्या आई सख्ख्या बहिणी आहेत. इरफान आणि नर्गिसचे लग्नही निश्चित झाले होते. पण, इरफानने काही काम करत नव्हता. त्यामुळे नर्गिसच्या घरच्यांनी या लग्नाला नकार दिला. सध्या इरफान फूड डिलिव्हरीचं काम करायचा. जे नर्गिसच्या घरच्यांना आवडत नव्हतं.

लग्नास नकार, रॉडने निर्घृण हल्ला

नर्गिस रोजच्याप्रमाणे स्टेनोच्या कोचिंगसाठी मालवीय नगरला यायची. शुक्रवारीही ती कोचिंगसाठी येथे पोहोचली. त्यानंतर इरफान तिला भेटला. बोलण्याच्या बहाण्याने इरफान नर्गिसला डीडीएच्या विजय मंडळ पार्कमध्ये घेऊन गेला. येथे त्याने नर्गिसशी लग्न करण्याचा विषय काढला. नर्गिसने इरफानशी लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. नर्गिसने दिलेल्या नकाराने इरफान संतापला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Delhi Builder Wife Murder: जिममध्ये मैत्री, भररस्त्यातच हत्या; मोबाइलमध्ये खुनाचं ‘राज’?

इरफान आधीच सोबत रॉड घेऊन गेला होता. नर्गिसने नकार देताच त्याने लोखंडी रॉडने हल्ला करण्यास सुरुवात केली. इरफानने अचानक केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून नर्गिसला सावरताच आलं नाही आणि ती तशीच खाली कोसळली. नर्गिस जमिनीवर पडताच इरफानने घटनास्थळावरून पळ काढला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये इरफान

शुक्रवारी (28 जुलै) दुपारी 12.10 च्या सुमारास उद्यानात मुलीचा मृतदेह पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज बघण्यास सुरुवात केली. त्यात पोलिसांना नर्गिससोबत इरफान दिसला. नर्गिसच्या हत्येची बातमी मीडियामध्ये पसरताच आरोपी इरफानने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं.

ADVERTISEMENT

पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपी इरफानचे लग्न त्याच्या मावशीची मुलगी नर्गिससोबत निश्चित झाल्यानंतर तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याला आता लग्न जमणार नाही असे वाटू लागले होते. त्याचवेळी त्याच्या धाकट्या भावाचे नाते जमले. यामुळे इरफान अधिकच अस्वस्थ झाला.

ADVERTISEMENT

दोन्ही कुटुंबे मूळची यूपीची

पोलिसांनी पुढे सांगितले की, दोन्ही कुटुंब मूळची उत्तर प्रदेशची आहेत. नर्गिसचे कुटुंब बऱ्याच दिवसांपासून संगम विहारमध्ये राहत आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाचा >> Sambhaji Bhide : “महात्मा गांधींचे वडील मुस्लीम जमीनदार”, भिडेंनी तोडले तारे

दक्षिण दिल्लीचे उपायुक्त चंदन चौधरी यांनी सांगितले की, कमला नेहरू कॉलेजमध्ये शिकणारी नर्गिस ही मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत पार्कमध्ये आली होती, तेव्हा तिच्यावर रॉडने हल्ला करण्यात आला. या उद्यानात तरुण मुले-मुली फिरत असतात. अरबिंदो कॉलेजही उद्यानाजवळ आहे.

दिल्ली अत्यंत असुरक्षित : स्वाती मालीवाल

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी 24 तासांत महिलांची हत्या होत असताना महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘दिल्लीत जिथे एका महिलेची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, तर दुसरीकडे मालवीय नगरसारख्या उच्चभ्रू भागात एका मुलीवर रॉडने वार करण्यात आले. दिल्ली अत्यंत असुरक्षित आहे. कोणाला काही फरक पडत नाही. केवळ वृत्तपत्रीय बातम्यांमध्ये मुलींची नावे बदलली जातात, गुन्हे थांबत नाहीत.’

डाबरी परिसरात महिलेची हत्या

दरम्यान, गुरुवारी रात्री राजधानी दिल्लीतील डाबरी भागात 42 वर्षीय महिला रेणू गोयलची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी 23 वर्षीय आशिषने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आरोपी आणि महिला एकमेकांना आधीपासूनच ओळखत असल्याचे समोर आले आहे. दोघेही जिममध्ये भेटले. रेणूला मंदिरात गोळ्या घालण्यात आल्या. तर आशिषचा मृतदेह घराच्या टेरेसवर पडला होता. त्याने देशी बनावटीच्या पिस्तुलाने स्वतःवर गोळी झाडली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT