Dhule Crime : गिरासे कुटुंबियांच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांना सापडला मोठा क्लू; सुसाईड की हत्या?
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबियातील चौघांच्या आत्महत्या प्रकरणाने सध्या शहर हादरल आहे. प्रवीण गिरासे आणि दीपांजली गिरासे या दाम्पत्यासह मितेश आणि सोहम या दोन्ही मुलांनी आत्महत्या केली होती. शहरातील प्रमोद नगर भागात ही घटना गुरूवारी उघडकीस आली होती. त्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
गिरासे कुटुंबियाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय
पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा
आत्महत्या प्रकरणाचा होणार उलगडा
Dhule Crime News : धुळ्यातील गिरासे कुटुंबियातील चौघांच्या आत्महत्या प्रकरणाने सध्या शहर हादरल आहे. प्रवीण गिरासे आणि दीपांजली गिरासे या दाम्पत्यासह मितेश आणि सोहम या दोन्ही मुलांनी आत्महत्या केली होती. शहरातील प्रमोद नगर भागात ही घटना गुरूवारी उघडकीस आली होती. त्यानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठा पुरावा देखील लागला आहे. या पुराव्यानंतर या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे. (dhule crime news four member found dead in house two kids and husband wife shocking crime story)
धुळ्याच्या प्रमोद नगर परिसरातील श्री समर्थ कॉलनीत गिरासे कुटुंबीय राहत होते. प्रवीण गिरासे यांचे फर्टीलायझरचे दुकान असून ते त्याच्या पत्नी आणि दोन मुलांसह या परिसरात राहत होते. मंगळवारी आपल्या मुलाचे अॅडमीशन करण्यासाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले होते. त्यानंतर मंगळवारपासून त्यांचा दरवाजा बंद होता.
हे ही वाचा: Shivdeep Lande : 'माझं नाव कुणाशीही जोडू नका', राजीनाम्यानंतर अखेर IPS शिवदीप लांडेंनी सगळं क्लिअर केलं!
या दरम्यान प्रवीण गिरासे यांची बहीण गुरूवारी त्यांना भेटण्यासाठी घरी आली होती. घराजवळ पोहोचताच त्यांना घराचा दरवाजा वरच्यावर लावलेला दिसला. तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली होती. घरात गिरासे कुटुंबातील पती, पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळून आले होते. या घटनेनंतर प्रवीण यांच्या बहिणीला धक्काच बसला होता.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
प्रवीण गिरासे यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत पहिल्या मजल्यावर सापडला होता. तर पत्नी दीपांजली गिरासे (44) आणि मुलगा मितेश गिरासे (18), सोहम गिरासे (12) या तिघांचा मृतदेह बेडरूममध्ये सापडले होते. या तिघांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सूरू केला आहे. या तपासा दरम्यान पोलिसांनी पत्नी दीपांजली आणि मुलगा नितेश आणि सोहम गिरासे या तिघांची हत्या केल्यानंतर प्रवीण गिरासे यांनी आत्महत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोटही सापडली होती. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आमच्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असे लिहले आहे.
हे ही वाचा: Big Boss Marathi: '...म्हणून मी निक्कीच्या थोबाडीत मारली', आर्या जाधवचा मोठा खुलासा
ही घटना तीन ते चार दिवसांपूर्वीच घडली असल्याची माहिती आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मृत व्यक्तीचे मोबाईल देखील ताब्यात घेतले आहेत. सोहम गिरासे याच्या मोबाईल मधून काही पुरावे पोलिसांना आढळले आहेत. तर गिरासे दाम्पत्यांचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक रिपोर्टनंतर या आत्महत्येचा उलगडा होणार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान धुळे शहरात गिरासे हे प्रतिष्ठित व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले कुटुंब म्हणून ओळखले जात होते. त्यांचे कुटुंब आत्महत्या करूच शकत नाही. त्यांचा कोणीतरी घातपात केला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता पोलीस तपासात काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT