ATM मधल्या 21 लाख रूपयांची झाली राख, डोंबिवलीत पैशांचा जाळ अन् धूर!

मिथिलेश गुप्ता

ADVERTISEMENT

dombivali crime 21 lakh cash burn by thieves while break atm shocking story
dombivali crime 21 lakh cash burn by thieves while break atm shocking story
social share
google news

Dombivali Crime News : चोरी करायची म्हटली की त्यासाठी फुलप्रुफ प्लानिंग करावीच लागते. जर ही प्लानिंग व्यवस्थित झाली नाही तर चोरी फसण्याची शक्यता असते. आता अशीच एक फसलेल्या चोरीची घटनी डोंबिवलीतून समोर आली आहे. त्याचं झालं असं की चोरांनी एटीएम लुबाडण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला असता,त्यामधील संपूर्ण कॅश जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यामुळे चोरट्यांच्या हाती नुसता जाळ आणि धुरचा लागला आहे. या घटनेची आता संपूर्ण डोंबिवलीत चर्चा रंगली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. (dombivali crime 21 lakh cash burn by thieves while break atm shocking story)

डोंबिवलीच्या महात्मा फुले रोडवर भारतीय स्टेट बँकेच्या एटीएम आहे. या एटीएमवर रविवारी ऱात्री चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी एटीएममधील पैसै लांबण्यासाठी गॅस कटरच सहारा घेतला होता. चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम कापण्याचा प्रयत्न केला होता. मात्र चोरट्यांच्या या प्रयत्नात आग लागून एटीएममधील संपूर्ण रक्कम जळून खाक झाल्याची घटना घडली.

हे ही वाचा : हवी होती मुलगी.. पण तिसरा मुलगा होताच बापाने घेतला चिमुकल्याचा जीव

एटीएममध्ये तब्बल 21 लाखाची रोकड होती. ही रोकड लुबाडताना आग लागली आणि संपूर्ण रक्कम जळून खाक झाली होती. त्यामुळे चोरांच्या हाती काहिच लागले नाही. त्यामुळे त्यांनी सीसीटीव्ही डिवीआर चोरून पळ काढला होता. या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. यावेळी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा तपास सूरू केला होता. आता या प्रकरणात विष्णुनगर पोलिसांनी आरोपी चोरट्यांचा शोध सुरु केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान कल्याण डोंबिवलीत घरफोडी आणि चोरीच्या घटना सुरूच आहेत.या प्रकरणी अनेक चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतके नाही तर सामान्य नागरीकांचे सामानही पोलिसांनी जप्त केले होते. आणि काही दिवसांपूर्वी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना लाखो रुपये परत करण्यात आले होते. हे सर्व सुरू असतानाच डोंबिवलीतून पुन्हा चोरीची घटना समोर आली आहे. या चोरीची चर्चा संपूर्ण शहरात सूरू आहे.

हे ही वाचा : Raj Thackeray : “हो, मी तुम्हाला घाबरवतोय कारण…”, ठाकरेंनी मांडली स्पष्ट भूमिका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT